Take a fresh look at your lifestyle.

मंगळसूत्र विकताय का कंडोम?; सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाचीकडून जाहिरात हटवूनही नेटकऱ्यांचा रोष मिटेना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सब्यासाची हे अतिशय प्रसिद्ध सेलिब्रिटी ज्वेलरी डिझायनर आहेत. त्यांच्या डिझाईनची नेहमीच चर्चा आणि कौतुक होत असते. मात्र यावेळी मंगळसूत्राच्या जाहिरातीसाठी त्यांनी अर्धनग्न मॉडेल वापरले आणि अनेकांच्या भावनांना हात घातला . याच्या परिणाम स्वरूप त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. खरं तर, नुकतेच सब्यासाची यांनी नव्या दागिन्यांचे कलेक्शन लाँच केले आहे. माहितीनुसार सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाची यांनी हि जाहिरात हटवली आहे. मात्र नेटकऱ्यांचा संताप अद्याप कायम आहे.

यामध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये मंगळसूत्रातील बारकाई दाखवताना ज्या मॉडेल्सचा वापर केला आहे. त्या मॉडेल्स अर्धनग्न असल्याचे आढळून आले. यात एका प्लस साइज महिला मॉडेलने मंगळसूत्रासह अंतर्वस्त्र परिधान केले होते. इतकेच नव्हे तर या फोटोमध्ये मॉडेलसोबत एक पुरुष मॉडेलही होता, जो शर्टलेस दिसत होता.

ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांनी संतापून प्रतिक्रिया देत म्हटले, सब्यासाची मंगळसूत्राची नाही तर कंडोमची जाहिरात करत आहे. याशिवाय संतप्त नेटकरी म्हणतात कि, ही जाहिरात हिंदू संस्कृतीवर हल्ला आहे आणि यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. दरम्यान एका यूजरने लिहिले, तुम्ही खरोखर कोणाची जाहिरात दाखवत आहात. आता हे दागिने कोणीही घालणार नाही, कारण तुम्ही जगाला दाखवून दिले आहे की, मी जर हे दागिने घातले तर मी एक अशीच स्त्री असेन. कृपया तुम्ही अशा जाहिराती करताना काळजी घ्या.

अंतर वस्त्र परीक्षण केलेली महिला मॉडेल मंगळसूत्राची जाहिरात करतेय हे पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या नव्या कलेक्शनवर आणि सब्यासाचीवर बहिष्कार टाकण्याचीही भाषा केली आहे. नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत लिहिले की, ‘यावर बहिष्कार टाका, आता हे पॉर्न ज्वेलरीचे केंद्र बनले आहे.’ खरतर सब्यासाची अशा डिझायनर्सपैकी एक आहेत जे नेहमी नवीन कलेक्शनसह नवे प्रयोग करत असतात. पण यावेळी नवीन कलेक्शन त्यांना चांगलेच महागात पडले आहे. याआधीही सब्यासाची ट्रोल झाली आहे.