Take a fresh look at your lifestyle.

‘ब्रह्मास्त्र’ची रिलीज डेट शेवटी खुद्द बच्चन यांनी केली ‘लॉक!’

सोशल कट्टा | रणबीर कपूर, आलिया भट्ट, आणि अमिताभ बच्चन स्टारर महत्वकांक्षी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ ची रिलीज डेट शेवटी पक्की ठरली आहे, ती आहे 4 डिसेंम्बर 2020.

आलियाने एक इंस्टा व्हिडिओ पोस्ट मधून, दिग्दर्शक आयान मुखर्जी यांच्याकडून रणबीर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळून ही तारीख अक्षरशः वदवून घेतली आहे. आयान ने देखील या तारखेची अधिकृत घोषणा केली आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची रिलीज डेट आजवर तीन वेळा बदलली आहे. त्यामुळे रणबीर आणि आलीयाचे चाहते नाराज होत होते, अखेरकार त्यांच्यासाठी ही खुशखबर बाहेर आली आहे.

आलिया आणि रणबीर यांच्या रिलेशनशिप च्या बातमी नंतर हा दोघांचा पहिलाच चित्रपट असून, यात रणबीर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे.