Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस आणि सलमानच्या नात्याला ब्रेक?; आगामी पर्वाच्या होस्टिंगसाठी करण जोहरची वर्णी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही जगतातील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस. आता लवकरच बिग बॉस शोचा १५ वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे चाहते अत्यंत खुश आहेत. मुळात या शोचे खास आकर्षण असते ते म्हणजे सलमान खानचे होस्टिंग. जसे काय, सलमान खान आणि बिग बॉस शो यांचे करण अर्जुनसारखे बंधनच आहे. अशीही मान्यता आहे कि, टीव्हीवरच नाही तर इथर प्लॅटफॉर्मवरही हा शो फक्त आणि फक्त सलमानमुळे जास्त हिट ठरतो. मात्र यावेळी बिग बॉस १५ हे पर्व थोडे वेगळे आहे. हे पर्व OTT प्लॅटफॉर्मवर Voot वर प्रसारित होणार आहे आणि यावेळी शोचा होस्ट सलमान नसून करण जोहर असेल. होय. हे खरं आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणा-या बिग बोस १५ या शोमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. बॉलिवूडचा डॅडी कंगनाच्या भाषेत पापा जो अर्थात करण जोहर यंदा VOOT वर चक्क हा शो होस्ट करताना दिसणार आहे. पण नाराज होऊ नका. कारण दुसरीकडे सलमान खानच टीव्हीवर हा शो होस्ट करणार आहे. ईदच्या मुहर्तावर या शोचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यात सलमान दिसतोय. त्यामुळे शोमध्ये बदल हा केवळ OTT प्लॅटफॉर्मसाठीच करण्यात आला आहे, हि बातमी भाईजानच्या चाहत्यांसाठी दिलासादायक आहे.

बिग बॉसच्या घरात काही मिळवायचं असेल तर घाम गाळावा लागतो, हे आपण जाणतोच. अगदी त्याच प्रमाणे करण जोहराला सलमानप्रमाणे पसंती मिळवण्यासाठी चांगलेच कष्ट पडणार असल्याचे आतापासूनच दिसतेय. सुरुवातीपासून सलमानने हा शो होस्ट केला आहे. पूर्वीच्या भागांमध्येही काही एपिसोडसाठी वेगेवेगळ्या अभिनेत्यांनी सलमानची जागा घेत शोला होस्ट केले होते. पण त्या भागांना हवी तितकी काही विशेष पसंती मिळाली नव्हती. त्यात करणची प्रतिमा आपण सारेच जाणतो. त्यामुळे आता करण जोहर OTT प्लॅटफॉर्मवर का होईना पण हा शो होस्ट करणार म्हटल्यावर रसिक त्याला कितपत पसंती देतील हे पाहणे रंजक असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.