Take a fresh look at your lifestyle.

दुल्हन वाली फिलिंग; Mohey’च्या नव्या जाहिरातीतील कॉन्फिडन्ट वधू नेटकऱ्यांना भावली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मोहे’ (Mohey) या ब्रायडल वेअर ब्रँडच्या प्रत्येक जाहिराती नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. याचे कारण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट. होय. आलिया भट्ट हि ‘मोहे’ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे प्रत्येक जाहिरातीत एक हटके अंदाज घेऊन ती लोकांसमोर प्रेझेन्ट झाली आहे. यावेळी तिची आणखी एक नवी जाहिरात चर्चेत आली आहे. या जाहिरातीसाठी आलियाने पुन्हा एकदा ब्रायडल लूक परिधान केला आहे. श्रेयांश वैद्य यांनी ‘दुल्हन वाली फिलिंग’ या अॅड कॅम्पेनअंतर्गत ही नवी जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

‘दुल्हन वाली फिलिंग’ या अॅड कॅम्पेनअंतर्गत प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीत मुलगा असो वा मुलगी त्यांच्यात समानता हि हवीच हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी आलियाची एक जाहिरात चर्चेचा विषय ठरली होती. या जाहिरातीत कन्यादानाच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला होता आणि ‘मुलीला परकं धन का म्हटलं जातं? मुली दान करण्याची गोष्ट आहे का? कन्यादान का? त्याऐवजी नवीन कल्पना आत्मसात करुयात, कन्यामान’, असा या जाहिरातीचा आशय होता. मात्र यावेळी केलेली जाहिरात हि लोकांना भावतेय. मुख्य म्हणजे यातील आलियाच्या वधू लूक आणि तिने परिधान केलेला लेहंगा कमालीचा आहेच. पण ती वाढू किती आत्मविश्वासू आहे हे या जाहिरातीत दिसतंय. जे लोकांना भावलं आहे.

या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या जाहिरातीत आलीय म्हणते कि, “मम्मी- पप्पांना भीती होती की कदाचित मी लग्नच करणार नाही आणि बळजबरी तर त्यांनी कोणत्याच बाबतीत केली नव्हती. जेव्हा जेव्हा लोक म्हणाले की मुलगी हाताबाहेर जाईल, तेव्हा माझं पूर्ण कुटुंब त्यांच्यावर धावून जायचं. त्यांना माहित होतं की त्यांची मुलगी इतरांपेक्षा वेगळी आहे पण चुकीची नाही. संस्कार तर सर्व आई- वडील आपल्या मुलांना देतात, पण त्यांनी मला आत्मविश्वास दिला, जशी आहे तशीच राहण्याचा.

आता तोच आत्मविश्वास घेऊन मी नवीन घरात नवीन नाती जोडायला जातेय”. या जाहिरातीतून स्त्री- पुरुष समानतेचा संदेश देताना मुलांना सामान वागणूक देणे, त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीसाठी बळजबरी न करणे आणि महत्वाचे म्हणजे मुलांसोबत त्यांची फॅमिली म्हणून नेहमी खंबीर राहणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.