Take a fresh look at your lifestyle.

आदिश वैद्यला परत बोलवा; बिग बॉस मराठीतील एव्हिक्शनवर प्रेक्षकांचा संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी ३’ या रिऍलिटी शोबे एक वेगळाच लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. पण नुकत्याच झालेल्या एव्हिक्शननंतर हि लोकप्रियता ढासळते का काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण नुकत्याच झालेल्या चावडीनंतर वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन घरात एंटर झालेला स्पर्धक आदींसह वैद्य काळ वोट कमी मिळाल्यामुळे घरातून बाहेर पडला. त्यामुळॆ तो आला काय आणि गेला काय हे कळलंच नाही. पण झालय असं कि त्याच एव्हिक्शन प्रेक्षकांना काही मान्य नाही. प्रेक्षकांनी बिग बॉसच्या चालू सिजनवर अत्यंत नाराजी दर्शविली आहे. इतकंच काय तर आदीशला परत घेऊन या असेही म्हटले आहे.

आदिश वैद्य हा बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा पहिला सदस्य होता. तो आला आणि घरात एक वेगळीच समीकरण पाहायला मिळाली. पण गेल्या आठवड्यात आदिश, मीनल, विकास आणि दादूस हे चौघे नॉमिनेट झाले. यानंतर काल आदींसह घरातून बाहेर झाला. आदिशने ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेतून स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. यामुळे त्याचे एव्हिक्शन होताच त्याचे चाहते संतापले. बिग बॉसच्या घरातून आदीश बाहेर पडला असे म्हटल्यावर अनेकांनी अनफेअर बिग बॉस, आदीशला परत बोलवा, उद्यापासून बिग बॉस पाहणे बंद अश्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या आहेत.

     

 

काल ‘बिग बॉस मराठी ३’च्या चावडीवर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे आणि रेशम टिपणीस आल्या होत्या. यावेळी मेघा आणि रेशम या दोघींनी घरातील सदस्यांचं भरभरून कौतुक केलं. त्यांच्या चुकांवर बोट ठेवले तर चांगल्या खेळाडूंचे कौतुक केले. याआधीच शनिवारी रंगलेल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सर्व सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली होती. शिवाय मला तुमच्यासोबत काहीही बोलायचं नाही म्हणत चावडी बंद देखील केली होती. आता त्यांच्या या शाब्दिक फटक्यांचा बिग बॉस मराठीच्या सदस्यांवर काय परिणाम होतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.