Take a fresh look at your lifestyle.

हटके ट्रेलर, हटके अंदाज, नव्या बंटी- बबली’ची भलतीच मिजास; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा जोरदार धमाका करायला बंटी और बबली २ या आगामी चित्रपटाचा सुपर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण यावेळी बंटी बदलला असला तरी बबली तीच आहे बरं का. नाही नाही.. यावेळी बंटी आणि बबली दोघेही बदलले आहेत किंवा दोघेही तेच आहेत पण तेच नाहीयेत. बरं. गडबडून जाऊ नका. सांगायचे असे की, यामध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जी हे तेच जुनेवाले बंटी बबली आहेत ज्यांनी शहरात गंडे घालायचा व्यवसाय जोरदार चालवला आणि आपले भरपूर मनोरंजन केले. फक्त झालेय असे कि अभिषेक बच्चन ऐवजी सैफ अली खान दिसेल. तर आधुनिक बंटी बबली म्हणून सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ हे या चित्रपटात सगळ्यांच्या नाकी नऊ आंतील. कारण बंटी और बबली २ मध्ये सिद्धांत हा एका सायबर हल्लेखोराची भुमिका साकारतोय तर सैफ तिकिट कलेक्टरच्या भुमिकेत दिसतोय. नुकताच या चित्रपटाचा दमदार मनोरंजक ट्रेलर रिलीज झाला आहे.

या ट्रेलरमध्ये जुन्या बंटी बबलीने चोऱ्या सोडून एक सुखी कुटुंब तयार केले आहे. आता लोक त्यांना विम्मी आणि राकेश म्हणून ओळखतात. पण बंटी आणि बबली या नावांवर त्यांनी स्वतःची मोहर लावलेली आहेच ना. असे असताना आता नव्या बंटी बबलीने शहरात डिजिटल माध्यमातून चोऱ्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे झालं असं कि पोलीस तर जुन्याच बंटी बबलीच्या मागे हात धुवून लागले आहेत. त्यामुळे वैतागलेले जुने बंटी बबली आता स्वतःचा पेटंट कोण वापरताय हे शोधून त्यांना धडा शिकवायचं ठरवतात आणि पोलिसांना मदत करू लागतात. त्यामुळे आता या चित्रपटात नक्की कोण बंटी आणि बबली आहे इथून सुरुवात होऊन जुने बंटी बबली नव्या बंटी बबलीला पकडण्यात यशस्वी होणार आहेत का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

हा ट्रेलर खूपच मजेदार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे. तर चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा आहेत. हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२१ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. सैफ आणि राणी यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आता चाहते खूपच उत्साहित आहेत. यापूर्वी त्यांनी ‘हम तुम’, ‘तारा रम पम’, ‘थोडा प्यार थोडा प्यार थोडा जादू’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.