Take a fresh look at your lifestyle.

तू तर लबाडांचा लबाड..; शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकी चितळेवर गुन्हा दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे बेधडक बोलण्यावर भर देतात. आपले परखड मत मांडताना ते पुढचा मागचा विचारसुद्धा करत नाहीत. मात्र काही कलाकार असे आहेत जे आजकाल केवळ स्वयंघोषित राहिले आहेत. इंडस्ट्रीत सक्रिय नाहीत मात्र प्रकाश झोतात राहण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहिलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही अशीच एक कलाकार आहे जी स्पष्ट बोलते आणि वाद ओढवून घेते. सध्या ती तिच्या एका नव्या प्रतापामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तीने नुकतेच तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. केतकीने तिच्या फेसबूक पोस्टमध्ये काव्य स्वरूपात पवारांवर शिंथोडे उडविण्याचा प्रयत्न केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की,
तुका म्हणे पवारा । नको उडवू तोंडाचा फवारा II
ऐंशी झाले आता उरक । वाट पहातो नरक,
सगळे पडले उरले सुळे । सतरा वेळा लाळ गळे II
समर्थांचे काढतो माप । ते तर तुझ्या बापाचेही बाप II
ब्राह्मणांचा तुला मत्सर । कोणरे तू ? तू तर मच्छर II
भरला तुझा पाप घडा | गप! नाही तर होईल राडा II
खाऊन फुकटचं घबाड । वाकडं झालं तुझं थोबाड ||
याला ओरबाड त्याला ओरबाड । तू तर लबाडांचा लबाड || असा ओळी केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

केतकीच्या या फेसबुक पोस्टनंतर तिच्या विरोधात स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी यामध्ये म्हटलं आहे की, केतकी चितळेने ही पोस्ट केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.