Take a fresh look at your lifestyle.

‘रावरंभा’साठी छ. उदयनराजेंनी दिला फर्स्ट क्लॅप; साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर शूटिंगला सुरुवात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवकालीन इतिहास आजच्या पिढीसमोर रुपेरी पडद्यावर सादर करणे हे एक आव्हान असले तरी आजचे निर्माते आणि दिग्दर्शक हि जबाबदारी उत्तमरीत्या पार पडताना दिसत आहेत. “रावरंभा” हा चित्रपट देखील एक ऐतिहासिक चित्रपट आहे. ज्याचे कथानक इतिहासाशी जोडलेले असले तरीही इतर चित्रपटांपेक्षा निराळे आहे. ‘रावरंभा’ या चित्रपटातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे, मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘राजधानी सातारा’ जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. साताऱ्यातील अजिंक्यतारा या किल्ल्यावर रावरंभा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. दरम्यान साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सेटवर भेट दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील पहिला भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट ‘रावरंभा’चे चित्रीकरण सध्या सातारा वाई परिसरात जोरदार सुरू आहे. धुलिवंदनाच्या दिवशी सातारा जिल्याची शान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अजिंक्यतारा किल्यावर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. याचे औचित्य साधून साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चित्रीकरणाला भेट दिली. तसेच क्लॅप मारून चित्रीकरणाचा आरंभ केला. यावेळी निर्माता शशिकांत पवार, दिगदर्शक अनुप जगदाळे, कॅमेरामन संजय जाधव, कला दिग्दर्शक वासू पाटील, कलाकार ओम भूतकर, अशोक समर्थ, संतोष जुवेकर, रोहित चव्हाण, संजय पाटील, विनायक चौगुले, कार्यकारी निर्माता अन्वय नायकवडी, प्रशांत नलवडे, पंकज चव्हाण, निर्माते दीपक देशमुख व सर्व रावरंभा चे तंत्रज्ञ व कलाकार उपस्थित होते.

‘रावरंभा – द ग्रेट वॉरियर ऑफ १६७४’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे श्री. शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे करीत आहेत. याआधी “झाला बोभाटा”, “भिरकीट”, “बेभान”, “करंट” असे चित्रपट त्यांनी केले आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप अशोक जगदाळे करीत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी “रावरंभा”चे लेखन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच संजय जाधव हे कॅमेरामॅन म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत.