Take a fresh look at your lifestyle.

फक्त 3 मिनिटांत 4 लाख रूपये कमावणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल बॉलिवूड इंडस्ट्री अगदी माफिया इंडस्ट्री असल्यासारखी भासतेय. म्हणजे सेक्स रॅकेट काय, पोर्नोग्राफी काय आणि ड्रग्ज प्रकरण तर काय रोजचेच झाले आहे. यात आतापर्यंत मोठमोठ्या सेलिब्रिटींना कायद्याने दंड दाखवला आहे. असे असताना आता आणखी एका अभिनेत्रीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल आहे. होय. मोठ्या ब्रेकनंतर अमिषा पटेल चर्चेत अली आहे पण कौतुकासाठी नव्हे तर टीकांसाठी. एका कार्यक्रमात तासाभराची कमिटमेंट देऊन ४ लाख रुपये फी घेणारी आमिष अवघ्या ३ मिनिटांतच पसार झाली आणि सगळी बोंबाबोंब झाली. मग काय झाला ना गुन्हा दाखल.

तसे पहाल तर, अलीकडच्या काळात काही फारशी चर्चेत नसणारी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हि अचानकच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागली. त्यामुळे एका कार्यक्रमात तिला पाहुनी म्हणून बोलावण्यात आले. बाईंनी १ तासासाठी आयोजकांना ४ लाख रुपये फी मागितली. आयोजकांनी ती दिलीसुद्धा. पण तिने मात्र कहर केला. तासाभराचा परफॉर्मन्स ३ मिनिटांत उरकून अक्षरशः आमिषाने पळ काढला. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आणि अमिषाने आपली फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला आहे. म्हणूनच आता तिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसे याआधीही अनेकदा आमिष कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली आहे. जसे कि, कार्यक्रमासाठी उशिरा पोचणे, आयोजकांशी वाद घालणे आणि इतर. माहितीनुसार, खंडवा जिल्ह्यामध्ये देवी नवचंडी देवाधामच्यावतीनं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमामध्ये १ तासाच्या सादरीकरणासाठी अमिषानं ४ लाख रुपये घेतले. मात्र तिने केवळ ३ मिनिटांचा परफॉर्मन्स करुन तेथून पळ काढला. यामुळे आयोजकांनी तिच्यावर फसवणूकच गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, आमिषाने या संपूर्ण प्रकरणी स्पष्टीकरण देत आयोजकांवरच आगपाखड करतेय. आयोजकांनी कार्यक्रमाचे आयोजित व्यवस्थित केले नव्हते. मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटत होती. म्हणून मी त्या कार्यक्रमातून लगेच गेली अस अमिषा पटेल म्हणाली आहे.