Take a fresh look at your lifestyle.

छवी मित्तल झाली कॅन्सरमुक्त; शस्त्रक्रियेनंतर इंस्टावर दिले हेल्थ अपडेट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। निगेटिव्ह ते पॉझिटिव्ह कसं व्हायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. पण असं जगायला प्रत्येकालाच जमतं असं नाही आणि जे हे जमवतात त्यांच्यासारखं होणं फार कमी जणांनाच जमतं. असंच काहीसं एक उदाहरण हिंदी टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल हिने तयार केलं आहे. नुकतीच छवीवर स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तिने इंस्टाग्रामवर आपले हेल्थ अपडेट जारी केले आहे. आपले फोटो पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांना पुरवली आहे.

छवीने पोस्ट करताना लिहिले आहे कि, ”समोर येणारा उज्ज्वल दिवस पाहता… डॉक्टर म्हणाले की आजचा तिसरा दिवस असल्याने वेदना लक्षणीयरीत्या कमी होतील. दरम्यान माझी बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे मी चालत आहे आणि मला वाटते की मी आज माझे केससुद्धा कोंब करण्याचा प्रयत्न करेन.

खरं सांगू तर याची मी वाट पाहत आहे! तूर्तास मी शस्त्रक्रियेतून बरे होण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि डॉक्टरांना पुढील कोणत्याही उपचारांबाबत मी विचारणा करीत नाही आहे… पण एका वेळी एक पाऊल. एका वेळी एक दिवस. दरम्यान, जेव्हा कोणी माझ्या खोलीत जाते, तेव्हा त्यांचे स्वागत पॉप संगीताने केले जाते! ती खोली माझ्यासारखीच सर्वाना सकारात्मक ठेवतेय!

याआधी छवीने तिच्या इंस्टावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात ती डान्स करताना दिसतेय. याला तिने कॅप्शन देत लिहिले होते कि, “डॉक्टर म्हणाले, छवी तुला रिलॅक्स राहण्याची गरज आहे. त्यामुळे मी असा डान्स करतेय. #preppingforsurgery”, असं तिने म्हटलंय. हा व्हीडिओ सध्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करीत लिहिले कि, ‘सकारात्मकता असावी, तर अशी’.

छवीने या शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित सकारात्मक संदेश दिले आहेत. जवळपास ६ तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. यानंतर ती कर्करोगमुक्त झाली आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर असह्य वेदना होत असल्यामूळे तिला अजूनही डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितले आहे. छवीने आतापर्यंत ‘तीन बहुरानियाँ’, ‘तुम्हारी दृष्टी’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘बंदिनी’ आणि ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.