Take a fresh look at your lifestyle.

बहुचर्चित मालिका ‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये होणार या अभिनेत्याची एन्ट्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’च्या यशानंतर आता ‘अग्गंबाई सूनबाई’ हे नवे पर्व सुरु करण्यात आले आहे. या मालिकेतील काही कलाकार बदलण्यात आले आहेत. मालिका सुरु झाली तेव्हा थोडा रसिकांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. मात्र हळूहळू आता या व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करू लागले आहेत. हि मालिका नुकतीच नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. यामुळे ‘अग्गंबाई सूनबाई हि मालिका चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत आता आणखी एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. शुभ्राच्या आयुष्यात आलेले वादळ थोपवायला आता अनुराग म्हणून चिन्मय उदगीरकर हा अभिनेता मालिकेत एन्ट्री करणार आहे.

मालिकेत सध्या शुभ्राच्या आयुष्यात एक वादळ आले आहे. नेमक्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच सोहम आणि सुझेन चं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आले आहे. सोहमच्या मिठीत सुझेनला ती स्वतःच्या डोळ्याने पाहते. या सम्पपूर्ण प्रकरणाचा शुभ्राला चांगलाच धक्का बसतो. यामुळे ती थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्यासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते. आता हा अनुराग गोखले कोण याबाबत रसिकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

अभिनेता चिन्मय उद्गीरकर ‘अनुराग गोखले’ नावाची भूमिका या मालिकेत साकारताना दिसणार आहे. अनुरागची एंट्री या मालिकेत अनोखे आणि रंजक वळण घेऊन येणार हे मात्र नक्की. शुभ्राच्या आयुष्यात अनुरागची भूमिका नेमकी काय असणार आहे? याविषयी सार्यांमध्येच उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेच्या येणा-या भागांमध्ये रसिकांना पाहायला मिळेल कि अनुराग शुभ्राच्या आयुष्याची घडी बसविणार का आणखी वादळं घेऊन येणार? तुर्तास रसिकांचा लाडका चिन्मय पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर त्याच्या भेटीला येणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.