Take a fresh look at your lifestyle.

कोरियोग्राफर गीता माँ नटली थटली आणि झाली नवरीबाई; फोटो झाले वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर अर्थात गीता माँ सध्या सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये दिसतेय. गीता माँ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या क्युट अंदाजात ती नेहमीच सगळ्यांना भूल पाडत असते. तूर्तास गीता माँ एका वेगळ्याच कारणामूळे चर्चेत आली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोत गीता इतकी सुंदर नटली आहे कि अगदी नवरीसारखी दिसतेय. विशेष म्हणजे तिने शेअर केलेल्या फोटोत लाल रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे. मुख्य म्हणजे आश्चर्य असे कि तिने भांगात कुंकू भरले आहे. या फोटोनंतर गीताने गुपचूप लग्न केले का काय.. ? अश्या चर्चांनी जोर धरला आहे.

गीता माँ चे हे फोटो पाहून चाहते अक्षरशः हैराण झाले आहेत. गीता अविवाहित असल्याचे नेहमीच सांगते. पण हे फोटो पाहिल्यानंतर ती अविवाहित आहे असे काही वाटत नाही. यामुळे गीताने गुपचूप लग्न तर केले नाही ना? असा प्रश्न तिचे चाहते सोशल मीडियावर विचारत आहेत.बर ठीक आहे.. केले लग्न. पण लग्न केले तर केले कुणाशी? असा प्रश्नही चाहत्यांसमोर उपस्थित राहिला आहे. आता गीताने खरंच लग्न केलं की नाही, हे येणा-या ‘सुपर डान्सर ४’च्या एपिसोडमध्येच कळू शकेल. कोणास ठाऊक कदाचित गीता स्वत: याबद्दल खुलासा करेल.

गीताने वयाच्या १५ व्या वर्षी फराह खानचा ग्रुप जॉइन केला होता. यानंतर तिने फराहसोबत कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम, मोहब्बते, कल हो न हो, ‘ओम शांति ओम सोबतच अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट म्हणून काम केले होते. ऐवढेच नव्हे तर तिने चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केले होते. गीताने फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, तीस मार खान आणि तेरे नाल लव हो गया यांसारख्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे. यासोबतच टीव्हीवर डान्स इंडिया डान्स, डीआयडी लिल चॅम्प्स आणि इंडियाज डान्सिंग सुपरस्टार या शोजची ती जज आहे.