Take a fresh look at your lifestyle.

ख्रिसमस सेलिब्रेशन पडलं महागात; अभिनेता सलमान खानला चावला साप

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन। बॉलीवूड चा भाईजान सलमान खान याला साप चावल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री पनवेलच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये सलमानच्या पायाला बिनविषारी साप चावला. यानंतर त्याला तात्काळ रात्री 3 वाजता एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी 9 वाजता सलमानला डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं. साप बिनविषारी असल्यामुळे सलमानच्या प्रकृतीत लगेच सुधार झाला. सध्या त्याची प्रकृती व्यवस्थित असून तो ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी उन्हं एकदा फार्म हाऊस वर परतला आहे.

25 डिसेंबरचा नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशन साठी सलमान काही जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत पनवेल इथल्या अर्पिता फॉर्महाऊसवर आला होता. शनिवारी रात्री फॉर्महाऊस परिसरात सलमानच्या पायाला सापानं दंश केला. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. मात्र खबरदारी म्हणून त्याला तात्काळ रुग्णालयात नेऊन त्यावर उपचार करण्यात आले. तूर्तास चाहत्यांचा लाडका भाईजान त्याच्या सेलिब्रेशनच्या तयारीत रमला आहे. शिवाय त आपल्या तब्येतीचीदेखील काळजी घेतोय त्यामुळे चिंतेची बाब नाही.

दरम्यान, 27 डिसेंबरला सलमान खान चा वाढदिवस असून सलमान आता 56 वर्षांचा होणार आहे. कोरोनामुळे सलमान आपला वाढदिवस साधेपणाने करणार असल्याचे समजत असून यावेळी सलमानच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी होणार आहे.