Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री आयशा टाकियासोबत CISF अधिकाऱ्याची गैरवर्तणूक; पतीने ट्विट करीत केले आरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियासोबत गोवा विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात CISF’च्या अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केली, असा आरोप आयेशा टाकियाचा पती फरहान आझमी याने केला आहे. डेस्कवरील एका सशस्त्र पुरुष अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि वेगळ्या रांगेत उभं राहण्यास सांगितलं. शिवाय विमानतळावर तपासणी करताना इतर अधिकाऱ्यांनीदेखील असभ्य टिप्पणी केल्या, असा आरोप फरहानने केला आहे.

फरहान आझमी याने लिहिले होते कि, मी मुंबईला IndiGo6E 6386 18:40 वाजताच्या फ्लाइटने येत होतो आणि हे वर्णद्वेषी अधिकारी आर पी सिंग ए के यादव, कमांडर राउत आणि वरिष्ठ अधिकारी (एसपी श्रेणी) बहादुर यांनी माझं नाव त्यांच्या टीमसमोर मोठ्याने वाचल्यानंतर जाणूनबुजून मला माझ्या पत्नी आणि मुलापासून वेगळ्या रांगेत उभं केलं. यानंतर सिक्युरिटी डेस्कवरील एका पुरुष अधिकाऱ्याने माझ्या पत्नीला स्पर्श केला तेव्हा वादाला सुरुवात झाली. इतर सर्व कुटुंबीय मात्र तपासणीसाठी एकाच रांगेत उभे होते. फक्त माझ्या पत्नीला आणि मुलाला वेगळ्या रांगेत उभं केलं गेलं. वरिष्ठ अधिकारी बहादूर यांनी गार्डला हाताने इशारा केला जो माझी तपासणी करत होता. त्या वर्णद्वेषीं गार्डने माझे खिसे तपासताना (ज्यात फक्त 500 ची नोट होती) असभ्य टिप्पणी केली. गोवा विमानतळावरील CCTV फुटेज तपासून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी करतो. त्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा.

यानंतर त्याने ट्विटमधून याप्रकरणी तक्रार दाखल करणार असून गरज पडल्यास कोर्टातही जाणार असल्याचा इशारा दिला. फरहानच्या या ट्विटला उत्तर देताना गोवा विमानतळाने टूिट केलं कि, “प्रवास करताना तुम्हाला आणि कुटुंबीयांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाची योग्य दखल घेतली जाईल” फरहानने त्यांचे आभार मानत पुढे लिहिलं, तुम्ही दिलेल्या उत्तरासाठी धन्यवाद माझ्या पत्नीला मुलासह बाजूला करणं हे अत्यंत लाजिरवाणं आणि त्रासदायक होतं. मी कायदेशीररित्यादेखील पाऊल उचलणार आहे.’

याबाबत डीआयजी अनिल पांडे यांनी सर्व आरोप फेटाळत CISF हे अत्यंत प्रोफेशनल फोर्स असल्याचे सांगताना म्हटले कि, “आम्ही (सीआयएसएफ) विमानतळावर दररोज सात लाखांहून अधिक प्रवाशांची तपासणी करतो. अशा किती तक्रारी किंवा आरोप केले गेले आहेत? त्यांना फक्त सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं गेलं आणि एकही अधिकाऱ्याने वर्णद्वेषी कमेंट केली नाही अधिकारी कधीही भांडण किंवा वाद घालत नाहीत. कारण त्यांचं काम सुरक्षा सुनिश्चित करणं आणि विमानतळावरील प्रोटोकॉलचं पालन करणं हे आहे.