Take a fresh look at your lifestyle.

दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिलेत..; ‘धर्मवीर’ पाहून ठाकरे झाले भावुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सिनेमागृहावरील हाऊसफुल्लची पाटी काही उतरेना. शिवसेनेचे कट्टर नेते आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले धर्मवीर नेते आनंदराव दिघे यांचा हा जीवनपट आहे. अनेक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देत चित्रपटाचे कौतुक केले आहे. यानंतर आता धर्मवीर चित्रपट स्वतः मुख्यमंत्री उद्धट ठाकरे यांनीही पाहून प्रतिक्रिया दिली आहे. पण विशेष बाब अशी कि, मुख्यमंत्री ठाकरे चित्रपटाचा शेवट न पाहताच बाहेर पडले. यानंतर अनेकांना अनेक प्रश्न पडले होते. दरम्यान माध्यमांशी बोलताना ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली तेव्हा ते भावुक झाल्याचे दिसून आले.

आनंद दिघेंचा जीवनपट ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. यानंतर प्रेक्षकांनी भरभरुन कौतुकही केले. या विकेंडला मुंबईतील नरिमन पॉईंट येथील आय़नॉक्स येथे चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाच्या शोसाठी आपली उपस्थिती लावली. मात्र चित्रपट पूर्ण संपण्याआधीच उद्धव ठाकरे थिएटरमधून बाहेर पडले. लोकांना पडलेल्या विविध प्रश्नांचे उत्तर त्यांनी थेट माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपट पाहिल्यानंतर माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देताना सांगितले कि, ”मी शेवटचा प्रसंग पाहू शकलो नाही. कारण आनंद दिघे गेल्यानंतर मी व्यथित झालेल बाळासाबहेब पाहिले आहेत. आनंद दिघे आमच्यातून जाणं हा आमच्या मनावर आघात आहे. शिवसैनिकांवर प्रेम करणारे बाळासाहेब आणि तसेच शिवसैनिकांवर प्रेम करणारे आनंद दिघे आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे मी शेवटचा प्रसंग पाहू शकलो नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद देणारे आनंद दिघे प्रसाद ओक यांनी पुन्हा जीवंत केले आहेत. त्यांनी अप्रतिम भूमिका केली आहे. विशेषतः आनंद दिघे यांच्या बारीकसारीक लकबी त्यांनी कशा आत्मसात केल्या मला कल्पना नाही पण असं कुठेही जाणवलं नाही. सर्वांनी हा चित्रपट आवश्य पहावं हे केवळ मी चित्रपट चालावा यासाठी नाही तर आयुष्य कसं जगावं यासाठी हा चित्रपट पहावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, प्रत्येक शहरात एक आनंद दिघे असावेत हे या चित्रपटातील एक वाक्य फार महत्वाचं आहे. ज्यावेळी आपल्या शहरात आनंद दिघे असतील असं केवळ शहरातील लोकांनाच नाही तर गुंडानाही वाटेल त्यावेळी आपल्याला तो आनंद दिघे नावाचा धाक, दरारा जाणवेल. सहाजिकच एक शिवसैनिक कसा असावा? निष्ठा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय? हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल. चित्रपटाचा खरा भाग आम्ही प्रत्यक्ष पाहिला. शिवसेना आणि आनंद दिघे यांचं नात अधिक घट्ट होतं, असे शिवसैनिक मला लाभले हे माझं भाग्य आहे. धर्मनिष्ठा, संघटना आणि आपली जनता यांच्यावर निस्सिम प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत.