Take a fresh look at your lifestyle.

एक तारा निखळला; मुख्यमंत्र्यांकडून दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार उर्फ मोहमद युसूफ खान यांचे आज पहाटे निधन झाले. दरम्यान ते ९८ वर्षांचे होते. त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना मुंबई खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांवर उपचार चालू होते. दरम्यान त्यांची पत्नी सायरा बानू यांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. शक्य तितके सर्व शर्थीचे प्रयत्न करूनही दिलीप कुमार यांचा जीवनप्रवास अखेर आज थांबला आणि बॉलिवूडमधील एक पर्व कायमस्वरूपी संपले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

 

सध्या दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन सुरु आहे. याकरिता अनेको दिग्गज आणि राजकीय मंडळी त्यांच्या घरी पोहोचली आहेत. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे. यासह त्यांनी शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करीत दिलीप साहब यांच्या पत्नी सायरा बानो यांना धीर दिला आहे.

याआधी अगदी काहीच तासांपूर्वीच ठाकरे सरकारने अभिनेते दिलीप कुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार असा निर्णय जाहीर केला आहे. अधिकृत माहितीनुसार, दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता मुंबईतील सांताक्रुज जुहू कब्रिस्तान येथे दफन विधी होणार आहे.

दिलीप कुमार यांना १९९४ सालामध्ये दादासाहेब फाळके या उच्च व मानांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९८ सालामध्ये दिलीप कुमार यांना पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान ए इप्तियाझ’ या पुरस्काराने गौरवले होते. याशिवाय त्यांना २०१५ सालामध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. यासह २००० ते २००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यदेखील होते. आज दिलीप कुमार आपल्यात भले नसतील मात्र त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेले चित्रपटसृष्टीतील काम नेहमीच त्यांना आपल्यात जिवंत ठेवेल. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर सध्या शोककळा पसरली आहे. अनेको कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.