Take a fresh look at your lifestyle.

जिंकलास रे भावा.. तू स्टार है; बिग बॉस मराठीचा विजेता विशालसाठी सहस्पर्धक विकासने केली खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन नुकताच जल्लोषात पार पडला. तब्बल १०० दिवसांचा प्रवास पूर्ण करून विशाल निकमने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यामुळे त्याच्या चाहत्यांनी अगदी उत्सव साजरा केला आहे. गेल्या रविवारी हा ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर विशाल निकम ठरला ‘बिग बॉस मराठी ३ चा विजेता. यानंतर आता सहस्पर्धक विकास पाटीलने आपल्या जिगरी मित्राला बिग बॉस मराठीच्या विजयासाठी शुभेच्छा देणारा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकास आणि विशाल हि दोस्ती तुटायची नाय गाणे म्हणताना दिसत आहेत. बीबी घरात तर यांची जोडी हिट ठरलीच यानंतर आता बाहेरच्या आयुष्यातही ते हि दोस्ती तोडणार नाही हे त्यांनी स्वतःच सांगितले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Patil | actor (@_vikas24_)

मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठी ३ चा स्पर्धक विकास पाटील हा बिग बॉसच्या टॉप ३ मध्ये होता. घरातले १०० दिवस त्याने विशाल सोबत जोडलेलं नातं मनापासून निभावलं आणि विशालनेही त्याची दोस्ती मनापासून टिकवली. यानंतर विशालच्या हाती बिग बॉसची ट्रॉफी पाहून स्पर्धक असला तरीही विकास फार खुश झाला. विकास आणि विशालची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. त्यांचं नातं मैत्रीहुन अधिक अगदी एकमेकांचे भाऊ असल्याप्रमाणे होते. अशातच विकासने सोशल मीडियावर त्याचा आणि विशालचा एक व्हिडिओ शेअर करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विकासने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, विकास आणि विशाल दोघेही बिग बॉसच्या सेटवर दिसत आहेत. विशालची ट्रॉफी दोघांनी ही हातात धरली आहे आणि ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे गाणे म्हणत आहेत. या व्हिडिओमधून त्या दोघांची मैत्री किती निर्माण आणि लॉन्ग टाइम फॉरेव्हर आहे याचा अंदाज येतो. हा व्हिडिओ शेअर करून विकासने त्याला कॅप्शन दिले आहे की, “ही दोस्ती तुटायची नाय! जिंकलास रे भावा , तु स्टार हे.. मनापासून अभिनंदन भावा, तुला आयुष्यातील पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा, तुझा हा मोठा भाऊ नेहमीच तुझ्या पाठीशी उभा आहे. I love you भावा.”