Take a fresh look at your lifestyle.

लवकर परत या..मी वाट पाहतेय; मानसी नाईकची पतीला आर्त साद घालणारी पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन ।मराठी अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या मोहक सौंदर्याने आणि घायाळ करणाऱ्या अदांच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. वाट बघतोय रिक्षावाला या गाण्यामुळे लाखो दिलों कि धडकन झालेलया मानसीचं दिल धडकलं ते प्रदीप खरेरासाठी आणि अनेकांच्या दिल्याचे हजार तुकडे झाले. यानंतर मानसीने प्रदीपसोबत साता जन्माची गाठ बांधली आणि मानसी नाईक झाली मिसेस खरेरा. यानंतर सोशल मीडियावर मानसीने पतीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या प्रत्येक पोस्टमुळे तरुणांचं मन घायाळ झालं असलं तरी मानसीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नेहमीच दिसून आला आहे. आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने मानसीने पुन्हा एक पोस्ट केली आहे. हि पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

अभिनेत्री मानसी नाईक हि सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. त्यामुळे ती नेहमीच तिचा पती प्रदीपसोबत वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. यानंतर आज तर ‘व्हॅलेंटाऊन डे’ या प्रेमाच्या दिवशी तिने पतीसोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. पतीला मिठी मारलेला हा फोटो शेअर करत तिने रोमॅन्टिक कॅप्शनही दिलं आहे. “एकमेकांचा हात हातात धरून आयुष्यभर सोबत राहुयात… आपण लांब असलो म्हणून काय झालं? तू लवकर ये मी तुझी वाट पाहतेय. हे आयुष्य एकमेकांसोबत खास बनवूयात…”, असं काहीस बायकोच्या मनातून आलेली आर्त साद घालणार कॅप्शन मानसीने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे तिची हि पोस्ट चर्चेत आली आहे.

मानसीची पोस्ट पाहून तिचे पती प्रदीप खरेरा यांनी तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीप खेर यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिले कि, मी पण तुझ्यावर खूप खूप आणि खूप जास्त प्रेम करतो. मला माहित आहे कि सध्या आपण खूप लांब आहोत. पण मी तुझ्यावर माझ्या हृदयाच्या तळापासून खूप प्रेम करतो आणि हो मी लवकरच येईन. आपलं काम पूर्ण झालं कि लगेच. माहितीनुसार, प्रदीप त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्त परदेशी असल्यामुळे सध्या मानसीपासून दूर आहेत आणि म्हणून मानसीने अशी पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pardeep Kharera (@pardeepkharera1)

तसे पाहता मानसी नाईक नेहमीच आपल्या फोटो आणि व्हडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. याआधी तिने केलेली एकही पोस्ट अशी नसेल जिला भरपूर लाईक्स आणि शेअरच्या माध्यमातून चाहत्यांनी प्रेम दर्शवले नाही. मानसी नेहमीच तिचा पती प्रदीप खरेरासोबत वेगवेगळ्या स्टाईल्स मध्ये फोटोशूट करते. त्यांचे फोटोशूट नेहमीच चर्चेत असते. मानसी आणि प्रदीप यांचा विवाह मागील वर्षी १९ जानेवारीला झाला. प्रदीप खरेरा बॉक्सर आहेत आणि त्यांचे मानसीवरील प्रेम नेहमीच ते व्यक्त करताना दिसून येतात.