Take a fresh look at your lifestyle.

कपिल शर्माने दिली गुड न्यूज; घरी चिमुकल्याचं आगमन

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी आणखी एक छोटा पाहुणा आला आहे. आज म्हणजेच 1 फेब्रुवारीला पहाटे त्याच्या पत्नी गिन्नी चतरथने मुलाला जन्म दिला.कपिल शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली असून पहाटे जन्म झाल्याचं सांगितलं आहे. यानंतर नेटकरी कपिल शर्माचं अभिनंदन करत आहे. बाळ आणि आई दोघंही सुखरुप असल्याचं कपिल शर्माने ट्विटमध्ये सांगितलं आहे.

पहाटे ५.३० वाजता कपिल शर्माने ट्विट करत माहिती दिली आहे की, “नमस्कार, आज सकाळी आम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या रुपात मुलगा आला आहे. ईश्वराच्या कृपेने बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमचं प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल”.

कपिल आणि पत्नी गिन्नी कुटुंबात नवा सदस्य येणार असल्याचं गुपित ठेवलं होतं. नोव्हेंबर २०२० मध्ये गिन्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती प्रेग्नंट दिसत होती. पण यासंदर्भात कपिल शर्माने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती.कपिल आणि गिन्नी डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. कपिलला एक मुलगी असून डिसेंबर 2019 मध्ये तिचा जन्म झाला होता. आज त्यांनी दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.