Take a fresh look at your lifestyle.

कोरोनामुळे युट्युबर भुवनवर पोरकेपणाची सावली; सारं काही उध्वस्त झालंय, म्हणत शेअर केली भावुक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे प्रिय जण दुरावले. अनेको घरे उध्वस्त झाली. मात्र कोरोनाचा कहर काही थांबेना. आता सुप्रसिद्ध यूट्यूबर भुवन बामवर देखील पोरकेपणाची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भुवनच्या आई आणि वडिलांचे दोघांचेही कोरोनामूळे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुवन बाम याने स्वतःहून हि माहिती त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. युट्युबर भुवन बाम याने एक भावूक पोस्ट शेअर करीत आपल्या चाहत्यांना हि दुःख बातमी देत शोक व्यक्त केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात भुवनला स्वत:लादेखील कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यावेळी त्याच्यावर घरातच योग्य ते सर्व उपचार सुरू होते. खुद्द भुवननेच त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. यानंतरचा बराच काळ भुवन त्याच्या घरातच क्वारंटाइन असल्याचे त्याने सांगितले होते. पण त्याच्या आई-वडिलांची काही वर्षा पासूनच तब्येत ठिक नव्हती. दरम्यान त्यांच्यावरही उपचार सुरू होते. भुवन गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून खूप दूर होता. कारण या काळात तो आई- वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेत होता. मात्र आता त्याचे आई- वडील या जगात न राहिल्याने भुवन फार खचला आहे.

याबाबतची माहिती आपल्या चाहत्यांना देताना त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्याने सोशल मीडियावर आई बाबांसोबतचा एक फोटो शेअर करीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. “मी माझ्या दोन्ही लाइफलाइन कोरोनामुळे गमावल्या आहेत. आई आणि वडिलांच्या नसण्याने सारं काही विखुरलंय.. आता आयुष्यात काहीच पूर्वीसारखं नसेल.

एका महिन्यात सारं काही उध्वस्त झालंय. घर, स्वप्न असं सारं काही उध्वस्त झालं. आई, बाबा आता माझ्यासोबत नाहीत. आता शून्यातून जगण्याला पुन्हा सुरुवात करावी लागेल. पण मन तयार होत नाही”. “मी एक उत्तम मुलगा ठरलो का? त्यांना वाचविण्यासाठी मी कमी पडलो का? असे प्रश्न आता आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. ते पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ शकतील का? मी आशा करतो की ते दिवस लवकरच येतील”, असे लिहीत भुवनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.