कॉमेडी अभिनेता कुशल बद्रिकेच्या चिंतेत वाढ; सोशल मीडियावर चर्चांना आले उधाण
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या जबरदस्त कॉमेडी शोमधून रसिकांचे निखळ मनोरंजन करून त्यांना खळखळून हसवणारा व सगळी दुःख विसरायला लावणारा कमल कॉमेडी अभिनेता म्हणजे आपला कुशल बद्रिके. विविध स्कीट्समधून कुशल नेहमीच अव्वल दर्जाचे मनोरंजन करतो. कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका यातून कुशल म्हणजे प्रेक्षकांची जान झाला आहे. सध्या कुशल सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. नुकतीच त्याने एक अशी पोस्ट केली आहे ज्यात त्याने स्वतःच आपली चिंता मांडली आहे.
नुकतेच कॉमेडी अभिनेता कुशल बद्रिके याने इंस्टाग्राम सोशल मीडियावर एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने आपली चिंता आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. कुशलने हि पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, मी खुप चिंतेत आहे, जर मी व्यायाम आणी योगाचे फोटो पोस्ट केले नाहीत, तर हा सोशल मीडियाचा समाज मला स्वीकारेल का ???? हि अशी पोस्ट वाचल्यानंतर सांगा कुणाला हसू आवरणार नाही. हे म्हणजे अगदी हात्त्तिच्या मारी असेच झाले नाही का? पण कुशल ब्रद्रिकेची हि मजेशीर पोस्ट पाहून त्याचे चाहतेही त्याला मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसत आहेत.
कुशलचे फॅन फॉलोईंग एकदम जबरदस्त आहे. यामुळे कुशल शूटिंग शिवाय ऑफस्क्रीन काय करतो हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते. सध्या सर्व सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. ट्विटर,फेसबुक आणि इंस्टाग्राम सध्या सेलेब्रिटी आणि त्यांचे चाहते याना एकत्र जोडून ठेवण्याचे काम करत आहे. यामुळे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्या चाहत्यांसह त्यांचे विचार मांडत असतात. कुशल ब्रद्रिकेसुद्धा इतर कलाकारांप्रमाणेच नेहमी त्याचे फोटो व्हिडीओ आणि त्याचे काही विचार सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसह शेअर करताना दिसतो.