Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नव्या वर्षात भाऊ कदमने सुरु केलं स्वतःच YouTube चॅनल; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bhau Kadam
0
SHARES
88
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या नव्या वर्षाच्या सुरुवातील अनेक कलाकारांनी आपली आगामी प्रोजेक्टसची घोषणा करत चाहत्यांना सरप्राईज दिली आहे. यामध्ये आता विनोदवीर भाऊ कदमचादेखील समावेश झाला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मनोरंजन विषय आपली एक वेगळीच ओळख निर्माण करणारा भाऊ आता सोशलाईज होत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम यानंतर आता त्याने स्वतःच ‘भाऊ कदम’ नावाचं युट्युब चॅनल सुरु केलं आहे. ज्याच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी गप्पा मारायला सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी एक व्हिडीओ शेअर करत त्याने आपल्या युट्युब चॅनलचा श्रीगणेशा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

या व्हिडीओमध्ये भाऊ कदमने विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पण सगळ्यात सुरुवातीला त्याने आपल्या लाडक्या चाहत्यांना सांगितले आहे कि, ‘नवीन वर्षापासून मी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. तर तुम्ही माझं चॅनल नक्की बघा. माझ्या या चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब जरूर करा.’ नव्या वर्षात नवं काहीतरी करण्याचा भाऊचा हा प्रयत्न सगळ्यांनाच भावला आहे. त्यामुळे भाऊचा हा पहिलाच युट्युब व्हिडीओ चांगला चालतोय. युजर्स या व्हिडिओला लाईक करत आहेत. चॅनल सबस्क्राईब करत आहेत.

भाऊ कडमने या चॅनलद्वारे शेअर केलेला पहिला व्हिडीओ आतापर्यंत १६८१ लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओवर ७० कमेंट्स आल्या आहेत आणि भाऊच्या या नव्या युट्युब चॅनेलला २४२ स्बस्क्राइबर मिळालेसुद्धा आहेत. हे चॅनल सुरु होऊन फक्त २ दिवसच झाले आहेत तर एव्हढा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अजून येत्या दिवसात जसजसं लोकांना या चॅनलविषयी कळेल तशी युट्युबवरपण भाऊची हवा सुरु होईल. भाऊने हे युट्युब चॅनेल त्याच्याविषयी तसेच त्याच्या कामाविषयी विविध माहिती देण्यासाठी काढल्याचे बोलले जात आहे. या पहिल्या व्हिडिओतही त्याने स्वतःच्या खजी आयुष्यासह, कामाविषयी भाष्य केले आहे. भाऊच्या या नव्या उपक्रमाला आणि प्रयत्नांना चाहत्यांनी प्रतिक्रिया देत खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: bhau kadamInstagram PostMarathi Comedy ActorViral Videoyoutube channel
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group