Take a fresh look at your lifestyle.

लोकप्रिय हास्यकलाकार पांडू यांचे कोरोनामूळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तमीळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय हास्यकलाकार पांडू यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. दरम्यान ते ७५ वर्षांचे होते. पांडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या त्यांच्या पत्नींची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.

पांडू यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजित कुमार यांच्या ‘कढ़ल कोटाई’ चित्रपटात हास्यकलाकाराची भूमिका साकारली होती. आपल्या निखळ अभिनयाच्या जोरावर त्यांनी लाखो प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले. चित्रपटांतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यानंतर पांडू यांनी अनेक चित्रपटात काम केले. अभिनेता विजयच्या ‘घिल्ली’ चित्रपटात पांडू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. प्रेक्षकांना त्यांचे विनोदाचे टायमिंग प्रचंड आवडत असे. पांडू यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकजण सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

काही दिवसांपूर्वी पांडू आणि त्यांच्या पत्नी कुमुधा यांना करोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी चाचणी केली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दोघेही चेन्नईमधील एका खाजगी रुग्णालयात तात्काळ भरती झाले. अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. योग्य ते सर्व उपचार सुरु असले तरी त्यांच्या तब्येतीत काही फारसा फरक पडला नाही. अखेर आज पांडू यांचे आज निधन झाले. त्यांची पत्नी कुमुधा यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर आयसीयूत सध्या उपचार सुरू आहेत.