Take a fresh look at your lifestyle.

मानेंनी.. फुल बाजार उठवला पीठमाग्या भटांचा!; किरण माने पून्हा चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुलगी झाली हो मालिकेमुळे अभिनेता किरण माने गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरले होते. राजकीय विषयांवर भाष्य केल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप मानेंनी केला होता. तर प्रोडक्शनने मानेची वर्तणूक चांगली नव्हती असा आरोप केला होता. यानंतर संबंधित प्रकरणी अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आणि वाद उफाळल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही काळाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा किरण माने त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. यावर अनेकांनी अनेक कमेंट्स केल्या असून यातील एक कमेंट फार चर्चेत आहे.

आटपाडीच्या ‘राजारामबापू हायस्कूल’ला किरण माने यांनी नुकतीच भेट दिली आणि याविषयी त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये मानेंनी लिहिले कि, …माझ्या मानदेशातल्या सावित्रीच्या लेकी मी येनार म्हनून लै वाट बघत होत्या ! आटपाडीच्या ‘राजारामबापू हायस्कूल’मधी मी पोचल्या-पोचल्या फुलं उधळून, निरंजन ववाळून स्वागत केलं माझं… लै माया माझ्यावर.. “किरणसर तुमीच जिंकनार. आमी आहोत तुमच्याबरोबर.” असं वरडुन फोटू बी काढलं… नाट्यप्रशिक्षण शिबीरात यशस्वी सहभाग घेतलेल्या मुलामुलींचा सत्कार माझ्या हस्ते झाला… याच मुलांच्या वयाचा मी असताना, याच मानदेशाच्या मातीत पयल्यांदा स्टेजवर उभा र्‍हायलोवतो… त्या आठवनी ताज्या झाल्या.. येता-येता मायनीत थांबून ती जागाबी डोळं भरून बघितली…त्यावेळच्या नाटकातले डायलाॅग अजून आठवत्यात.. ते पुटपुटत व्हतो. लोकांना कळंना ‘ह्यो डोळे का पुसतोय?’..काय सांगू? लै नाॅस्टॅल्जिक झालोय…

किरण मानेंनी नेहमीप्रमाणे आपल्या अंदाजात ही पोस्ट लिहिली असता, एका नेटकऱ्याने ‘व्याकरणाच्या अनेक चुका’ अशी कमेंट केली. त्यावर उत्तर देत किरण मानेंनी लिहिलं, ‘लादलेलं व्याकरन कोलने हा एककलमी कारेक्रम हाय भावा!’ किरण मानेंनी दिलेल्या उत्तरावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्याचं पाहता नंतर संबंधित युजरने ती कमेंट डिलिट केली. मात्र या सगळ्यांत एक कमेंट चांगलीच वादग्रस्त आणि चर्चेचा विषय ठरली आहे. ती कमेंट म्हणजे, मी एवढच म्हणेल की,” ओ पाथरकर काय ह्ये??? किरण मानेंनी विदेशी वैदिक आतंकवादी ब्राम्हणांच मार्केट डाउन केल राव लाॅकाडाऊनगत! फुल बाजार उठवला पीठमाग्या भटांचा!”