Take a fresh look at your lifestyle.

भोपाळींवर केलेले वक्तव्य अग्निहोत्रींना भोवले; मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मिरी पंडितांच्या जीवनाचे भाष्य करणारा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’मुळे त्याचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री चर्चेत आहेत. या चित्रपटाविषयी वेगवेगळी मत दिसून येत आहेत. दरम्यान एक गट समर्थन करतोय तर दुसरा विरोध. हे कमी का काय..? म्हणून विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांनी भोपाळीचा अर्थ होतो समलैंगिक असे वक्तव्य केले आहे. परिणामी हे विधान वादाच्या रूपात परिवर्तित झाले असून आता अग्निहोत्रींनवर मुंबईत तक्रार दाखल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पांडे नावाच्या २७ वर्षीय जनसंपर्क व्यवस्थापकाने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रोहित पांडे हे तक्रारदार मूळचे मध्य प्रदेशातील भोपाळ येथील असून त्यांनी या प्रकरणी तातडीने एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. भोपळी लोकांबाबत अशा पद्धतीचे वक्तव्य करणे चूक आहे असे त्यांचे स्पष्ट मत असून पोलिसांनी लवकरात लवकर तडक कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले की, लोक अनेकदा ‘भोपाळींना’ त्यांच्या नवाबी इच्छांमुळे समलैंगिक समजतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री बोलताना दिसत आहेत कि, मी भोपाळमध्ये मोठा झालो मात्र मी भोपाळी नाही. भोपाळी हे एक वेगळ कनेक्शन आहे. भोपाळीचा एक वेगळाच अर्थ होतो. तो मी तुम्हाला नंतर खासगीत समजवेन. भोपाळीचा अर्थ होतो समलैंगिक. असे वक्तव्य केल्यानंतर यावर भलताच वाद निर्माण झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर आधी वादाचे वादळ निर्माण झाले होते. ते कायम असताना आता कायदेशीररित्या विवेक अग्निहोत्रींनवर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याआधी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीदेखील विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. दिग्विजय सिंह यांनी विवेक अग्निहोत्रींवर निशाणा साधत एक ट्विट केले होते. यात त्यांनी लिहिले कि, विवेक अग्निहोत्री जी, हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. तो सामान्य भोपाळी रहिवाशाचा नाही. मी ७७ पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे. पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही राहिला असाल त्यामुळे हा “संगतीचा प्रभाव असू शकतो”.