Take a fresh look at your lifestyle.

मांजरेकरांचा ‘…कोन नाय कोन्चा’ कायदेशीर अडचणीत; सिनेमातील दृश्यांवर न्यायालयात तक्रार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। निर्माता, दिग्दर्शक आणि अभिएंटे महेश मांजरेकर यांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा मराठी चित्रपट अगदी प्रोमोपासून वादात अडकला आहे. याचे कारण चित्रपटातील काही दृश्य ठरत आहेत. यानंतर आता मांजरेकरांविरोधात मुंबई न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्या या चित्रपटात महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार क्षत्रिय मराठा सेवा संस्थेकडून करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NH Marathi (@nh_marathi)

त्यांनी वांद्रेतील दंडाधिकारी न्यायालयात हि तक्रार दाखल केली आहे. दरम्यान आयपीसी कलम २९२ -अश्लील सामग्रीची विक्री इ., २९५ – अश्लील कृत्ये वा शब्दांसाठी शिक्षा, ३४ या कायदे कलमांअंतर्गत मांजरेकरांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. यात महेश मांजरेकर, नरेंद्र, श्रेयांश हिरावत आणि ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचे निर्माते एनएच स्टुडिओज यांच्यावर कलम लावण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by NH Marathi (@nh_marathi)

या संदर्भात वकील डी. व्ही सरोज यांनी तक्रार दाखल करतेवेळी लिहिले कि, ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा मराठी चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात महिला आणि लहान मुलांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवले आहे. तर मांजरेकरांच्या विरोधात तक्रारकर्त्याने दावा करीत लिहिले की, चित्रपटातील आशयामुळे समाजात असंतोष निर्माण झालाय. परिणामी राज्यात अनेक ठिकठिकाणी निदर्शनेदेखील झाली आहेत त्यामुळे हि तक्रार योग्य आहे. या मराठी चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर आणि ईशा दिवेकर या कलाकारांनी काम केले आहे.

माहितीनुसार, दिवंगत ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर मांजरेकरांचा ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे संपूर्ण कथानक हे मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित आहे. शिवाय या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच वादात आणि तितकाच चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तरुणांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला. मात्र यातील आक्षेपार्ह दृश्यांमुळे अगदी राज्य महिला आयोगाकडूनदेखील चित्रपटावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर आता थेट कायदेशीर कारवाईकडे या प्रकरणाने वळण घेतले आहे.