हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ९ ऑगस्ट २०२२ आणि आजच्या दिवशी सिनेसृष्टीतून एका अवलिया कलाकाराने चटका लावणारी एक्झिट घेतली आहे. अभिनेता प्रदीप पटवर्धन यांनी मुंबईतील गिरगावात आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान हृदय विकाराचा झटका हे त्यांच्या निधनाचे कारण ठरले. वयाच्या 64 व्या वर्षीच प्रदीप पटवर्धन यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी, चाहते यांच्यासह इतर क्षेत्रातही शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री ते अन्य बऱ्याच नेते मंडळींनी पटवर्धन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे. pic.twitter.com/CVjESFYCkf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 9, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, ‘मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.’
मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज दुःखद निधन झाले. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने मराठी कलासृष्टीने एका उत्तम कलाकाराला गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/C2IneROCEE
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 9, 2022
याशिवाय जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत लिहिले कि, ‘मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज दुःखद निधन झाले. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने मराठी कलासृष्टीने एका उत्तम कलाकाराला गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मोरूची मावशी असो वा कॉमेडीची बुलेट ट्रेन; त्यांचा अभिनय बघणं हा नेहमीच मन प्रसन्न करणारा अनुभव असायचा. मराठी रसिकमनांत त्यांचं स्थान अढळ आहे. भावपूर्ण श्रद्धांजली ! pic.twitter.com/D8J6dubIbC
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 9, 2022
तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मोरूची मावशी असो वा कॉमेडीची बुलेट ट्रेन; त्यांचा अभिनय बघणं हा नेहमीच मन प्रसन्न करणारा अनुभव असायचा. मराठी रसिकमनांत त्यांचं स्थान अढळ आहे. भावपूर्ण श्रद्धांजली !’
आपल्या अभिनयाने मराठी रसिक मनाला अनेक दशकं भुरळ घालणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!#PradeepPatvardhan pic.twitter.com/ghMLS0PNV5
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 9, 2022
तर साताऱ्याचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ट्विटमधून भावना व्यक्त करत लिहिले आहे कि, ‘आपल्या अभिनयाने मराठी रसिक मनाला अनेक दशकं भुरळ घालणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’
Discussion about this post