Take a fresh look at your lifestyle.

सुशांतसिंग प्रकरणी CBI चे सोयीस्कर मौन; काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी व्यक्त केला संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची त्याच्या आत्महत्येपासून अद्याप चौकशी आणि तपास सुरु असल्याचे दिसत आह. दरम्यान हि केस सीबीआयकडे सुपूर्त झाल्यानंतर हा तिढा लवकर सुटेल अशी आशा होती. मात्र आता सीबीआय चौकशीला तब्बल एक वर्ष उलटले, तरीही सीबीआय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. या प्रकरणामागे कोणाचा दबाव तर नाही ना? किंवा महाराष्ट्रातील तपास जाणीवपूर्वक अंतहीन ठेवण्याचे मोदी सरकारचे आदेश आहेत का? अशी विचारणा करीत सीबीआयने यासंदर्भातील भूमिका तात्काळ स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले कि, सीबीआयने बिहार पोलिसांकडून सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूची चौकशी हाती घेण्याला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १७७ कलमाचे उल्लंघन केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि मविआ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा राजकीय डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा याकरिता वापर केला गेला. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला.

पुढे म्हणाले, मविआ सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनीती आखून भाजप संचलित वाहिन्यांना सुशांतसिंगचा खून झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत होते. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली आहे. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्युब अकाउंट तयार केले. यांच्या माध्यमातून अपप्रचार केला. भाजपने या प्रकरणात महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली. त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, असेही सावंत म्हणाले.