Take a fresh look at your lifestyle.

कंगनाच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक; अकोल्यात तक्रार दाखल करीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आजकाल एकामागोमाग एक अशी काही वक्तव्य करत आहे ज्यामुळे ती आपसूकच चर्चेचा विषय होत आहे. अलीकडेच कंगनाने “१९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती’ असं वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे संपूर्ण देशभरातून तिला रोष पत्करावा लागत आहे. यानंतर हा वाद चांगलाच उफाळला असताना विक्रम गोखलेंनी दिलेल्या समर्थनाने कदाचित कंगना चांगलीच हुरळली आणि तिने थेट राष्ट्रपिता गांधीजींवर देखील निशाणा साधला होता. कंगनाच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. यामुळे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कंगनाची बेताल वक्तव्यानं टाळा घालण्यासाठी आज अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरोद्दीन यांनी तक्रार दाखल केली आहे. हाजी सय्यद कमरुद्दीन यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, “अभिनेत्री कंगना रनौत हिने वादग्रस्त वक्तव्य करून स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केला आहे. त्यामुळे कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच याबाबत पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांना निवेदनही दिले आहे”.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिने एका मुलाखतीत १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक होते. खरे स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळाले असे म्हणत मोठा वाद ओढवून घेतला होता. यानंतर देशभरातून टीकांचा मारा झाल्यानंतर ती शांत बसली नाही तर यावेळी तिने थेट राष्ट्रपिता महात्मा गांधींवर निशाणा साधला. कंगनाने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात केलेल्या विधानांवरून आणखी एक वाद उफाळला. परिणामी देशभरातील कंगनाविरोधात संताप तीव्र होत चालला आहे. दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी कंगनाला चांगलेच फटकारले आहे. यानंतर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील कंगनाचा समाचार घेतला आहे.