Take a fresh look at your lifestyle.

जुही चावलाला दिलासा; 5G खटल्यादरम्यान ठोठावलेला दंड 20 लाखांवरून 2 लाखांपर्यंत कमी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्यावर २०२१ शाळांमध्ये 5G तंत्रज्ञानाविरोधात बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हि धाव जुहीच्याच अंगाशी आल्याचे दिसले होते. देशात 5G मोबाइल नेटवर्क उभारण्यास एका याचिकेद्वारे जुही चावलासह अन्य दोन जणांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने सुनावणी दरम्यान याचिकेतील त्रुटी दाखवून कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना २० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. यानंतर आता 5G खटलाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जुहीला कायद्याचा गैरवापर केल्यामुळे ठोठावण्यात आलेला दंड २० लाखांवरून २ लाख रुपयांपर्यंत कमी केला आहे. यामुळे जुहीला मोठा दिलासा मिळाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेत्री जुही चावलावरील दंड २० लाखांवरून २ लाख रुपयांपर्यंत कमी केला आहे. याशिवाय खंडपीठाने देशात 5G वायरलेस नेटवर्कच्या स्थापनेविरुद्ध दाखल केलेला खटला फेटाळताना न्यायाधीशांनी केलेली अनेक निरीक्षणे देखील वगळली आहेत. गतवर्षी अभिनेत्री जुही चावलाकडून दाखल करण्यात आलेली याचिका फाजील स्वरूपाची आहे, असा आक्षेप घेत कोर्टाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. शिवाय याचिका कर्त्यांविषयी आम्ही अजूनही मवाळ भूमिका घेत आहोत. त्यांनी २० लाखांची रक्‍कम भरल्यानंतर त्यांच्या विरोधातील न्यायालयाची बेअदबी केल्याचा खटला मागे घेण्यात येईल, असे म्हणत कोर्टाने सांगितले होते.

दिल्ली उच्च न्यायालयाने ४ जून २०२१ वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देणारी अभिनेत्री जूही चावलाची याचिका फेटाळली होती. शिवाय याचिकाकर्त्यांना २० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. “सदोष”, “कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर” आणि “प्रसिद्धी मिळवण्यासाठी” याचिका दाखल करण्यात आली असल्याचे कोर्टाने म्हटले होते. यानंतर जुहीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती. यात 5G नेटवर्कमुळे पृथ्वीवरील मानवासहित सर्व प्राणिमात्रांना हानी पोहोचेल, असे जुही चावला व तिच्या सहकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे तिने ही याचिका केली होती, असेही तिने सांगितले. यासह आमचा 5G तंत्रज्ञानास विरोध नाही पण त्यामुळे हानी होणार नाही याचे पुरावे द्या असेही जुहीने स्पष्ट केले होते.