Take a fresh look at your lifestyle.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘या’ सिनेमांना लागले कोरोनाचे ग्रहण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन ।  कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिकांनी शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत, मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावे, क्रीडा स्पर्धा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे नागरिक सतर्क आहेत. शुक्रवारी जे सिनेमे प्रसिद्ध झाले त्याला प्रेक्षकांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. चित्रपट गृहसमोर सगळीकडे शुकशुकाटच पाहायला मिळत होता.

Untitled design (16)

दरम्यान शुक्रवारी सुबोध भावेचा मुख्य भूमिका असलेला ‘विजेता’ आणि बिग बी अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांचा मुख्य भूमिका असलेला  ‘एबी आणि सीडी’. तर हिंदी रूपेरी पडद्यावर इरफान खान आणि राधिका मदान यांच्या भूमिका असलेला अंग्रेजी मिडीयम या सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमांवर कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे रसिकही सिनेमागृहांकडे वळले नसल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळाले. तसेच प्रदर्शित झालेला सिनेमांवरही कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे.