Take a fresh look at your lifestyle.

‘कोरोनाचा कहर, त्रस्त बॉलिवूडकर’; अभिनेता नकुल मेहताच्या बाळावर ICU मध्ये उपचार सुरु

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा सगळ्यांना सळो कि पळो करून सोडल्याचे दिसत आहे. अलीकडेच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता सेलिब्रेटींसोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब धोक्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता नकुल मेहताच्या अवघ्या ११ महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. इतकेच नव्हे तर या बाळाला ICU मध्ये भरती करावे लागले आहे. तूर्तास त्यावर उपचार सुरु आहेत. याविषयी नकुलची पत्नी जानकी हिने सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

नकुलची पत्नी जानकी हिने भावूक पोस्ट लिहित म्हटले आहे कि, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सुफीला(बाळ) देखील ताप येऊ लागला. त्याचा ताप १०४.२ वर गेला. त्यामुळे मध्यरात्री त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. माझ्या बाळाला कोविड आयसीयू वॉर्डमध्ये नेणे माझ्यासाठी फार कठीण होते. त्याला अँम्बुलन्सने हॉस्पिटलला नेल्यानंतर ताप कमी करण्यासाठी त्याला ३ IVS लावल्या. रक्त चाचणी, RTPCR, सलाईनच्या बाटल्या, अँटीबायोटीक आणि इंजेक्शन देण्यात आली. हे सगळ पाहून मला प्रश्न पडला की माझ्या चिमुकल्या मुलामध्ये या सगळ्याला तोंड देण्याची शक्ती आली तरी कुठून?’

जानकीने पुढे लिहले कि, ‘३ दिवसांनी सुफीचा ताप उतरला. तब्बल २४ तास हॉस्पिटलमध्ये सुफीची काळजी घेणे माझ्यासाठी फार कठीण होते. मीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने थकवा जाणवत होता. त्यावेळी सुफीची आया हॉस्पिटलमध्ये सुफीसोबत राहण्यासाठी तयार झाली. तिचे उपकार मी कधीही विसरणार नाही’. तसेच सुफीवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचेदेखील खरचं खूप आभार. ‘कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट सौम्य असला तरी लहान मुलांची काळजी घेतलीच पाहिजे. तुमच्या बाळाला मास्क लावल्याशिवाय बाहेर पाठवू नका, लहान मुलांचे लसीकरण करा आणि त्यांना सुरक्षित ठेवा’, असे आवाहनदेखील जानकीचे केले. यानंतर सुफी आता बरा आहे, असे सांगत तिने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. अगदी २ आठवड्यांपूर्वीच अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली होती आणि यानंतर पत्नी जानकीला देखील कोरोनाची लक्षणे दिसू लागली. तिची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे स्वतः पॉझिटिव्ह असताना बाळाचीही काळजी घेणे खरच तिच्यासाठी फार कठीण वेळ होती.