Take a fresh look at your lifestyle.

रिया चक्रवर्तीला ड्रग्स प्रकरणात मोठा धक्का, कोर्टाने जामीन नाकारला

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | चित्रपट अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह सर्व आरोपींची जामीन याचिका मुंबईच्या कोर्टाने शुक्रवारी फेटाळून लावली.एनसीबीने म्हटले आहे की जर आरोपींना जामिनावर सोडण्यात आले तर ते पुराव्यांसह छेडछाड करू शकतात आणि खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रियाला आता 22 सप्टेंबरपर्यंत तुरूंगात रहावे लागणार आहे. रिया आणि शौविक यांना ड्रग कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली.

या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या बंदी घातलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण कमी असले तरी ते व्यावसायिक प्रमाण होते आणि त्यांची रक्कम 1,85,200 रुपये असल्याचे एनसीबीने गुरुवारी जामीन अर्जाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला.

अ‍ॅड. सतीश मानशिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेत रिया चक्रवर्ती म्हणाल्या की, रियाला तीन दिवसांच्या चौकशीदरम्यान एनसीबीसमोर हजर केले असता रियाला कबुलीजबाब देणे भाग पडले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’