Take a fresh look at your lifestyle.

पुन्हा एकदा कोठडी; आर्यन खानच्या जामिनावर न्यायालयाचा नकार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई क्रूझ ड्रग्जप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत होता. यानंतर त्याच्या जामिनासाठी २ वेळा न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आणि अखेर आज यावर निकाल मिळाला आहे. गेल्या १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा पूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी निकालासाठी आजचा दिवस निवडला. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचेही जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामुळे निश्चितच शाहरुख खानच्या चिंतेत प्रखर वाढ झाली आहे.

आर्यन खानच्या जामिनावर बराच वेळ युक्तिवाद झाल्यानंतर अखेर न्यायालयाने आपला निर्णय देत त्याच्यासाठी जामीन नाकारला आहे. बुधवारी एनसीबीने कोर्टात आर्यनचे असे काही वॉट्सअँप चॅट सादर केले, ज्याचा संबंध ड्रग्जशी होता. दरम्यान आर्यन सोबत, क्रूझमधून आणखी ७ लोकांना अटक केली होती. यानंतर या प्रकरणात बरेच धागेदोरे NCB च्या हाती लागले आहेत. संदर्भात, न्यायालयात आर्यनच्या जामिनावर गेल्यावेळी सुनावणी होणार होती तेव्हा NCBने म्हटले होते की, आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेत होता असे पुरावे दर्शवतात. शिवाय आर्यनच्या ताब्यातून काहीही सापडलेले नसले तरीही त्याच्या चॅटमधून त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध आहे हे उघड होत आहे. त्यामुळे जामीन दिल्यास याचा तपासावर प्रभाव पडू शकतो.

NCBने मागील सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत केलेले ड्रग्जसंबंधीत चॅटिंगची माहिती कोर्टात सादर केली आहे. हे संभाषण कोर्टात सादर केल्यानंतर आर्यनच्या जामीनावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले. याशिवाय NCBने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं होत आणि यानंतरच सादर केल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी आर्यनने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केल्याचे उघड होत आहे. त्यामुळे कोर्टाने अधिक वेळ न ताणता पुढील तपासाच्या दृष्टिकोनातून आर्यन खानसह मुनमून धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचादेखील जामीन अर्ज फेटाळला आहे.