Take a fresh look at your lifestyle.

सायली संजीवच्या अदांवर भाळला क्रिकेटपटू ऋतुराज; फोटोवरील कमेंटमुळे आला चर्चेला उधाण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रिकेटर ऋतुराज गायकवाड हा कित्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. तर अभिनेत्री सायली संजीव अनेक तरुणांसाठी स्वप्नसुंदरी. सध्या या दोघांबाबत सोशल मीडियावरील चर्चेला चांगलाच जोर आला आहे. याचे कारण असे कि ऋतुराजला सायलीचा बोल्ड अंदाज जरा जास्तच भावलेला दिसतोय. त्याने तिच्या फोटोवर कमेंट देखील केली आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या कमेंटवर सायलीनेसुद्धा हार्ट इमोजीचा रिप्लाय दिलाय. मग काय? हि मैत्री आहे? कि त्याहून अधिक? याबाबत सोशल मीडियावर या दोघांच्या कमेंट्स उचलून घेत जोरदार चर्चा सुरु आहेत.

अभिनेत्री सायली संजीव सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे आपल्या विविध अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोच. नुकतेच सायलीने तिच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले होते. यातील एका फोटोवर ऋतुराजने “Woahh” अशी कमेंट केली होती. ऋतुराजच्या या कमेंटने सा-यांचे लक्ष वेधून घेतले. एवढ्यात या कमेंटवर सायलीने रिप्लाय म्हणून हार्ट इमोजी टाकला आणि या चर्चाना हवाच मिळाली.

सायलीच्या फोटोवर ऋतुराजची कमेंट आणि त्याच्या कमेंटवर सायलीचा खास रिप्लाय दोन्ही त्यांच्या चाहत्यांसाठी आकर्षणाचे कारण आहे. यातील सायलीचा त्याच्या कमेंटवरील रिप्लाय पाहून दोघांमध्ये नक्कीच मैत्रीपलीकडे नाते खुलत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या आहेत. सायली आणि ऋतुराज यांच्यात नेमकं काय सुरुय हेच जाणून घेण्याची उत्सुकता आता दोघांच्याही चाहत्यांना लागली आहे.

त्यांच्या या कमेंट्स नंतर दोघ्यांच्याही चाहत्यांनी रिप्लाय करीत अनेक कमेंट्स केल्या आहेत. कुणी म्हणताय मराठमोळी छान दिसेल. तर कुणी म्हणतय दाल में कुछ काला है. इतकेच नव्हे तर पोरगी लाजली रे लाजली आणि कुछ तो गडबड है दया अश्या प्रकारच्या चेष्टा मस्करी करीत चाहते कमेंट्स करू लागले आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘काहे दिया परदेस’ ही या मालिकेतून गौरी हे पात्र साकारत सायलीने आपली वेगळी अशी जागा निर्माण केली. प्रेक्षकांना भावलेली सायली तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौन्दर्यामुळेदेखील लोकप्रिय आहे. या मालिकेनंतर तिने रुपेरी पडद्यावर देखील दमदार एंट्री केली आहे. तिने काही मराठी चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. सायलीला केवळ अभिनयाची नव्हे तर सुंदर चित्रे साकारण्याची देखील आवड आहे. काही दिवसांपूर्वी तिचा वॉल पेंटिंग करतानाच व्हिडीओ देखील चांगलाच चर्चेत होता.