Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेटपटू शमीची बायको हसीन जहाँ चा हा भन्नाट व्हिडिओ व्हायरल….

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला गोत्यात आणणारी त्याची पत्नी हसीन जहा सध्या चर्चेत आली आहे. कारण बऱ्याच दिवसांनी हसीनने एक व्हिडीओ बनवला आहे. बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावरचा हा हसीनचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी हसीनने एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी आपल्याबरोबर या फोटोमध्ये शमी असल्याचेही हसीनने दाखवले होते. पण शमीने या गोष्टीचा इन्कार केला होता. त्यानंतर हसीनने बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण बरेच दिवस तिचे व्हिडीओ पाहायला मिळत नव्हते. पण हसीनने आज बॉलीवूडच्या गाण्यावरचा एक भन्नाट व्हिडीओ आता पोस्ट केला असून लोकांनी तिचा चांगला प्रतिसाद दिल्याचेही पाहायला मिळत आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाच्या एका नावाजलेल्या गाण्यावर हसीनने एक व्हिडीए बनवला आहे. हिमेशचे एक रोमँटीक गाणं चागलंच हिट झालं होतं. ते गाजलेलं गाणं होतं, ‘तेरी, मेरी, तेरी मेरी प्रेमकहानी’. या गाण्यावर आता हसीनने एक भावूक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ बऱ्याच चाहत्यांनी पाहिला असून हसीनला यावेळी काही जणांनी प्रश्नही विचारले आहेत.

हसीनने यापूर्वी बरेच व्हिडीओ बॉलीवूडच्या गाण्यावर केले होते. पण त्यापेक्षा यावेळी केलेला हा व्हिडीओ वेगळा असल्याचे बोलले जात आहे. कारण यावेळी हसीन भावुक झाली असून तिला शमीची आठवण येत असल्यचे म्हटले जात आहे

Comments are closed.