हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. सिद्धार्थ आणि मिताली दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतात. या जोडीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे साहजिकच सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. सध्या मिताली आणि सिद्धार्थ स्पेनमध्ये एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. या दरम्यानचा एक बोल्ड बिकिनी लूक मितालीने शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध लूक शेअर करताना दिसते. अनेकदा ती बोल्ड फोटो आणि पोझ देत नेटकऱ्यांना अचंबित करत असते. असाच एक खास लूक तिने शेअर करत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मितालीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्पेन ट्रिपमधील एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये मिताली बिकिनीत दिसतेय आणि तिने समुद्रकिनारी फोटोसाठी अतिशय बोल्ड पोझ दिली आहे. या फोटोमधील मितालीचा हॉट अंदाज उन्हाळ्याच्या दिवसात आणखीच तापमान वाढवतो आहे. तिचा हा लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
मितालीने हा बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर करताना एक कॅप्शन शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे कि, ‘आज सकाळी उठून मी कॉन्ट्रोव्हर्सीला निवडलं. कमेंट सेक्शनमध्ये आपली संस्कृती याबाबत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल’. मितालीने या कॅप्शनमधून थेट ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. या फोटोवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘असे कपडे घालायला संस्कृती नाही गं. फिगर लागते’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘मराठी मुलीने असं काही केलं कि तिला नावं ठेवणारे आणि संस्कृतीची लाज काढणारे, सनी लिओनीला रात्री गपचूप चादरीआत बघत असतात’.
Discussion about this post