Take a fresh look at your lifestyle.

Cruise Drugs Case – व्हॉट्सअ‍ॅप चॅट अनन्याच्या अंगलट; चंकी पांडेच्या घरी NCB रेड, मन्नतवरही टो-टच

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा लेक आर्यन खान सध्या मुंबई कॉर्डेलिया क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगाचा पाहुणचार घेत आहे. दरम्यान त्याच्या जामीन याचिकेवर मात्र न्यायालयाने नकारावर नकाराचे सत्र लावले आहे. यानंतर २० ऑक्टोबर बुधवारी सत्र न्यायालयाने पाचव्यांदा जामीन नाकारल्यानंतर आर्यनने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. एकंदरच या सगळ्या प्रकारामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेदेखील NCB च्या निशाण्यावर असल्याचे दिसत आहे.

आर्यनचा जामीन अडकवणारे ते व्हॉट्सअप चॅट अनन्यासोबतचे असून गुरूवारी NCB अधिकारी अनन्याच्या घरी धडकले. इतकेच नव्हे तर या पाठोपाठ शाहरूखच्या मन्नतवर देखील NCBच्या अधिका-यांनी छापेमारी केली.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, आर्यनचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स NCB च्या हाती लागले आहेत. हे चॅट न्यायालयात सादर केल्यानंतरच आर्यनच्या अडचणी वाढल्या असून त्याचा जामीन नाकारण्यात आला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान क्रूझ ड्रग्स पार्टी केसमध्ये आर्यन खानसोबत बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्रीचे चॅट NCBच्या हाती लागल्याची माहिती मिळाली होती. या चॅटमध्ये ड्रग्जसंदर्भात बोलणं झालं होतं. ही नवोदित अभिनेत्री म्हणजे, अनन्या पांडे असल्याचं आता समोर येत आहे. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र याच पार्श्वभूमीवर आज NCB अधिका-यांनी अनन्याच्या घरी छापेमारी केली आणि यानंतर आज दुपारी २ वाजता तिला चौकशीसाठी बोलावल्याचे समन्स देण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूजवरून NCB च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यादिवशी अनन्या पांडेसुद्धा क्रूझवरच्या त्या पार्टीत हजर होती. मात्र कथित माहितीनुसार NCBने तिला जाऊ दिले होते. पण आर्यनच्या चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव समोर आल्यानंतर NCB अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आणि आता अनन्याच्या अडचणी वाढल्या आहेत. अनन्या ही आर्यन खानची खूप चांगली मैत्रिण आहे. तर आर्यनची बहीण सुहाना खान ही सुद्धा अनन्याची बेस्ट फ्रेंड आहे, असे समजत आहे. आता या प्रकरणात ज्या पद्धतीने बॉलिवूड कलाकारांनी मुलं असल्याचे समोर येत आहे ते पाहिल्यानंतर बॉलिवूडचे भविष्य धोक्यात आहे का काय? असा प्रश्न पडतोय.