Take a fresh look at your lifestyle.

सलमान भाईचा ‘दबंग ३’ शेवटी शंभरी पार! ‘या’मुळे लागले जास्ती दिवस

0

बॉक्स ऑफिसवाले । सलमानच्या म्हणण्याप्रमाणे देशातील CAA आणि NRC वरून चाललेल्या विवादामुळे दबंग ३ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम झाला आहे. चित्रपटाला तुलनेत चांगली सुरुवात मिळाली नाही, सहसा सलमानच्या चित्रपटांचा ओपनिंगचा आकडा ४० कोटी पार होतो, या चित्रपटाने मात्र कसा बस २४.५० करोडचा बिझनेस केला. मात्र रविवार नंतर चित्रपटाच्या व्यवसायात आणखीन घसरण झालीय.

पण भाई शेवटी ‘भाई’च आहे, बॉक्स ऑफिस इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, चित्रपटाने मंगळवारी शंभरी गाठली. मंगळवार अखेर ‘दबंग ३’ ची १०४ कोटींची कामे झाली आहे. इतर स्टार्सच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन पेक्षा हा गल्ला खूप जास्त आहे. रिपोर्ट चांगला नसला तरी भाईचे फॅन्स थिएटरात धडक मारून येतातच. त्यामुळे ‘गुड न्यूज’ येईपर्यंत भाईचा गल्ला अजूनही २५ कोटींनी वाढेल यात शंका नाही.

आणखी एक, दबंग ३ ची अपेक्षेइतकी कमाई झाली नसली तरी, ‘वॉर’, ‘भारत’ आणि ‘साहो’ नंतरचा हा वर्षातील चौथा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: