Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खान झाला ५४ वर्षांचा ‘ही’ आहेत त्याची एव्हरग्रीन गाणी…

0

चंदेरी दुनिया । बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान आज 54 वर्षांचा झाला आहे. दरम्यान सलमान हा असा एक मेगास्टार आहे ज्याचे चाहते देशा परदेशात लहान मुलांपासून वयोवृद्ध असा सार्‍याच वयोगटातील आहे. त्यामुळे केवळ सलमान खानच्या बर्थ डे दिवाशीच नव्हे तर ईदचा दिवस, महत्त्वाच्या सिनेमाच्या रिलीज दिवशी हमखास वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ येथील त्याच्या राहत्या घराच्या खाली चाहत्यांची तोबा गर्दी पहायला मिळते.

आज सलमानच्या चाहत्यांमध्ये बर्थ डे सेलिब्रेशनचे खास प्लॅन्स असतील पण अभिनयासोबतच त्याच्या गाण्याची आणि हटके डान्स मुव्हची नेहमी चर्चा होते. सलमान खानच्या गाण्यामध्ये त्याची खास सिग्नेचर स्टेप भाव खाऊन जाते. मग तुम्ही जर सलमान खानचे चाहते असाल तर तुमच्या सलमान खान स्पेशल गाण्यांच्या प्ले लिस्टमध्ये ही गाणी नक्की असतील.

सलमान खान यंदा बॉलिवूडमध्ये 30 वर्ष पूर्ण करत आहे. मागील काही वर्षांमध्ये सलमान खान पार्श्वगायन करतानाही दिसला. मराठी, हिंदी सिनेमांमध्ये सलमान खानने पार्श्वगायन केले आहे.
सलमान खानची सुपरहीट गाणी
ओ ओ जाने जाना

आज शाम होने

चोरी चोरी सपनो मैं

देखा है पहली बार

धिक ताना धिक ताना

मेरे रंग मै रंगने वाली

पहला पहला प्यार

यंदा सलमान खानच्या बर्थ डे चं सेलिब्रेशनचा प्लॅन थोडा हटके आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा सलमान खानच्या वाढदिवसादिवशी त्याची बहीण अर्पिता खान शर्मा दुसर्‍या बाळाला जन्म देणार आहे. काल मुंबईमध्ये रात्री उशिरा काही जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत त्याने बर्थ डे केक कापून सेलिब्रेशनला सुरूवात केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: