Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण मेगा स्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलीवूड गाजवणाऱ्या महानायक रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. कन्नड, तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम , इंग्लिश, बंगाली अशा अनेक चित्रपटामध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटावणाऱ्या जेष्ठ अभिनेते रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सिनेसृष्टीतील मनोरंजन विश्वात रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले नाव ठसविलेले आहे. त्यांना १९७५ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. लहान वयापासूनच त्यांना विविध व्यक्तिरेखा साकारण्याचा छंद होता. शाळेत असताना त्यांनी ‘खलनायक’ म्हणून एका नाटकात काम केले होते. तर ‘रावणाची’ भूमिका देखील भूषविली होती.

चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ते “बेंगळुरू मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन” मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कार्यरत होते. घराजवळ असलेल्या राम हनुमान मंदिरात स्टंटची प्रॅक्टिस करता करता मोठा झालेला हा नायक आज कित्येकांसाठी प्रेरणा आहे. अनेकजण त्यांची पूजा करीत असले तरीही, ते मात्र त्यांच्या पहिल्या चित्रपटाचा मुख्य नायक ‘कमल हसन’ या अभिनेत्याचे मोठे चाहते आहेत.

प्रत्येक चित्रपटात अव्वल भूमिका साकारणाऱ्या नटास “दादासाहेब फाळके पुरस्कार” मिळणे म्हणजे, त्यांच्या कामाची पावती मिळण्याजोगे आहे. हा पुरस्कार जाहीर करतेवेळी ‘ आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे ‘ असे वक्तव्य मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.