Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दगडी चाळ 2’चे कलाकार पोहोचले मार्कंडेश्वराच्या दर्शनाला; व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dagdi Chawl 2
0
SHARES
9
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता मकरंद देशपांडे अभिनित ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येत्या १९ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मुंबईतील गॅंगवॉर विषयी बोलताना सर्वात पहिलं नाव घेतलं जाणाऱ्या डॅडींच्या आयुष्यावर आधारित आहे. डॅडी म्हणजे अरुण गुलाब गवळी. ज्यांनी दाऊदलासुद्धा देश सोडायला भाग पाडलं. यांची आव्हानात्मक भूमिका अभिनेता मकरंद देशपांडे साकारत आहेत. तर अन्य मुख्य भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी आणि पूजा सावंत दिसणार आहेत. याआधी चित्रपटाचे प्रमोशन सुरु करण्यात आले असून चित्रपटाला यश यावे म्हणून संपूर्ण टीम मार्कंडेश्वर महादेवाच्या मंदीरात गेली होती.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

‘जय शंभो नारायण’ आणि डॅडी हि दगडी चाळीची खरी ओळख आहे. डॅडींची महादेवावर निस्सीम श्रद्धा असल्याचे म्हटले जाते. यामुळे चित्रपटाला यश मिळावे अशी प्रार्थना घेऊन दगडी चाळ २ ची संपूर्ण टीम वरळीच्या महादेवाच्या मंदिरात पोहोचली होती. दरम्यानचे फोटो अभिनेता अंकुश चौधरीने शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि. ‘महादेवाच्या टीम ‘दगडी चाळ २’ ची वरळीच्या श्री मार्कंडेश्वर महादेव मंदिरास भेट… शिव शंभूच्या आशीर्वादाने झाली प्रमोशनची सुरवात… ‘दगडी चाळ २’.. १९ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!’

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

संगीता अहिर निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी १९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षक आधीच प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दगडी चाळ चित्रपटाची पुढील कथा पहायला मिळेल. डॅडींचा उजवा हात सूर्या यावेळी त्यांच्यावरच का फिरला…? या प्रश्नाचे उत्तर यात मिळेल. या चित्रपटाबाबत खास सांगायचे म्हणजे हा एक बहुप्रतीक्षित चित्रपट असून याचे पोस्टर आणि ट्रेलर रिअल डॅडींच्या हस्ते प्रदर्शित झाले. याशिवाय आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर या चित्रपटाचे पोस्टर दिमाखात झळकले. आता प्रतीक्षा फक्त आणि फक्त प्रदर्शनाची..

Tags: Ankush ChoudhariDagdi Chawl 2Instagram PostMakrand Deshpandepooja sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group