Take a fresh look at your lifestyle.

अबब!!! चक्क एवढी आहे नसीरुद्दीन शाह यांची एकूण संपत्ती

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज २० जुलै रोजी 70 वा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याचसोबत त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी जवळपास ४५ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘जाने तू या जाने ना’, ‘जुनून’, ‘आक्रोश’, ‘चक्र’, ‘द डर्टी पिंक्चर’, ‘सरफरोश’, ‘जाने भी दो यारो’, ‘इक्बाल’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांचा भूमिका विशेष गाजल्या. पण नसीरुद्दीन शाह यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

‘रिपब्लिक’ने दिलेल्या वृत्तानुसार नसीरुद्दीन शाह यांच्याकडे एकूण ३७८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. नाटक, चित्रपट आणि जाहिराती हे त्यांच्या उपन्नाचे स्त्रोत असल्याचे म्हटले जाते. नसीरुद्दीन शाह यांना तिन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘स्पर्श’, ‘पर’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच ‘इक्बाल’ चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून देखील २००६मध्ये राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

रुपवेध प्रतिष्ठानचा २०१९ चा तन्वीर पुरस्कार देखील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना जाहीर करण्यात आला होता. आजवर नसीरुद्दीन शाह यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नसीरुद्दीन यांनी पाकिस्तानी चित्रपट ‘जिंदा भाग’मध्ये देखील काम केले आहे हे फार कमी लोकांना माहित आहे.

 

Comments are closed.