कोई मिल गया… मिल ही गया! केजोच्या बर्थडे पार्टीतील शाहरुखचा डान्स व्हिडीओ व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील अत्यंत नामांकित निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याचा नुकताच ५०वा वाढदिवस त्याने जोरदार साजरा केला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्याने मुंबईत यशराज फिल्म्स स्टुडिओ येथे जंगी सेलिब्रिटी पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याच्या वाढदिवसाच्या या पार्टीत अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. जवळ जवळ सगळं बॉलिवूड आणि काहीस टॉलिवूडसुद्धा या पार्टीत होतं. केजोच्या पार्टीत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर खान, सैफ अली खान, मलायका अरोरा, सलमान खान, आमिर खान, मनिष मल्होत्रा, जान्हवी कपूर, हृतिक रोशन, राणी मुखर्जी, काजोल यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. शिवाय विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया हे टॉलिवूडमधील कलाकारसुद्धा या पार्टीला हजर होते.
दरम्यान या पार्टीतील काही खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये शाहरुख खानचा डान्स व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. यामध्ये शाहरुखने कुछ कुछ होता है चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हा त्याच्या १९९८ साली रिलीज झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील गाण्यावर नाचताना दिसतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरनेच केले होते. या चित्रपटातील अनेक गाणी लोकप्रिय आहेत. अगदी आजही हा चित्रपट आणि त्यातील गाणी लोकांच्या लक्षात आहेत आणि त्यावर थिरकणे प्रेक्षक पसंत करतात. या चित्रपटात शाहरुखसोबत काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. तर या पार्टीतसुद्धा हे त्रिकुट दिसून आलं.
Kejo
दरम्यान या व्हिडीओमध्ये शाहरुखने कुछ कुछ होता है या चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय गाणे कोई मिल गया यावरल हुक स्टेप्स केल्या असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत या व्हिडिओत दिग्दर्शिका फराह खानसुद्धा नाचताना दिसतेय. विशेष सांगायचे म्हणजे या गाण्याची कोरिओग्राफी फराह खाननेच केलेली आहे. या चित्रपटातून करण जोहरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि यानंतर केजो कभी रुका नहीं..| या चित्रपटात शाहरुखने राहुल नामक भूमिका साकारली होती. तो राहुल प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी राहुल परत आलाय अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.