Take a fresh look at your lifestyle.

तारीख ठरली! फरहान- शिबानी करणार फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरिज आणि एप्रिलमध्ये शाही विवाह

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकामागे एक लग्नाची लाईन लागल्याचे दिसून येत आहे. एकंदरच काय तर बॉलिवूडमध्ये लगीनसराई चालू आहे. अलीकडेच विकी कौशल – कॅटरीना कैफ यांचं लग्न झालं यानंतर नुकतंच मौनी रॉय आणि नीरज नांबियार विवाहबद्ध झाले. यानंतर आता बॉलिवूडचं आणखी एक बहुचर्चित कपल येत्या महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. हे कपल म्हणजे फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर. माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये कोर्टमॅरेज आणि त्यानंतर एप्रिलमध्ये शाही विवाह सोहळा अश्या पद्धतीने फरहान शिवानी सात जन्माची आठ बांधणार आहेत.

 

बॉलीवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तर हा यावेळी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. पहिल्या लग्नानंतर विभक्त झालेला फरहान मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकरच्या प्रेमात पडला. यानंतर हे कपल सतत चर्चेत राहील आहे. अखेर या वर्षी त्यांच शुभमंगल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या फेब्रुवारी महिन्यात ते दोघे विवाहबद्ध होणार आहेत. माहितीनुसार, फरहान आणि शिबानी या २१ फेब्रुवारी २०२२ला कोर्ट मॅरेज करणार आहेत. पण झालय असं कि, या दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच फरहान- शिबानी फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज करून नंतर एप्रिलमध्ये शाही विवाहसोहळा करणार आहेत.

फरहान अख्तर हा एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, पार्श्वगायक, निर्माता आणि टेलिव्हिजन होस्ट आहे. तो एक आघाडीचा बॉलिवूड अभिनेता आहे. तर शिबानी दांडेकर एक भारतीय- ऑस्ट्रेलियन गायिका, अभिनेत्री, अँकर आणि मॉडेल आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकन टेलिव्हिजनमध्ये टेलिव्हिजन अँकर म्हणून केली. भारतात परतल्यानंतर, तिने मॉडेल आणि गायिका म्हणून काम करण्यासोबतच हिंदी टेलिव्हिजन आणि कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यक्रम होस्ट करण्यास सुरुवात केली.