Take a fresh look at your lifestyle.

सुशांत सिग च्या गर्लफ्रेंड ला जीवे मारण्याची धमकी

मुंबई । सुशांत सिग ला जाऊन काल एक महिना झाला. कालच रिया चक्रवर्ती हिने इन्साग्राम वर सुशांत साठी एक भावनिक पोस्ट लिहली होती. सुशांत सिग च्या आत्महत्येपासून रिया चक्रवर्ती ला सर्व नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.त्यातच काल तिला जीवे मारण्याची धमकी आली आहे.तसेच तिच्यावर रेप करण्याची धमकी पण दिली गेली आहे. याबाबत तिने मुंबई सायबर क्राईम ला तिने याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे.

रियाने हि पोस्ट मुंबई क्राईम सेंटर ला टॅग करत लिहले आहे कि , “आता खूप झालं मी प्रत्येक गोष्ट सहन केली, सर्वानी मला खुनी म्हंटले. तरीही मी माझी शांतता भंग होऊ दिली नाही. माझी शांतता तुम्हाला हे शिकवते का ? कि जर मी आत्महत्या नाही केली तर तुम्ही मला जीवे ठार कराल. किंवा बलात्कार कराल. तुम्ही ज्या प्रकारे बोलता आहात यावर कधी विचार केला आहे का? अश्याप्रकारे कोणाचा छळ करत असाल तर तो गुन्हा आहे. हे तुम्हाला माहित नाही का? असा सवाल करत तिने पोलिसांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रियाने सुशांत सोबत चा फोटो शेअर करत म्हंटल होत कि, मी तुला कधीच विसरू शकत नाही. तुझ्यामुळे मला प्रेम आणि विश्वास मिळाला. तुझ्यामुळे मला गणित आवडू लागलं होत. मी तुला कधीच दूर लोटू पाहत नव्हती . तू माझ्यापासून इतका दूर गेला आहे कि आपण कधीच भेटू शकणार नाही अश्या आशयाची पोस्ट तिने लिहली होती.

Comments are closed.