Take a fresh look at your lifestyle.

दिपाली सय्यद थिरकली लेकासोबत, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तोंडात घातली बोटं

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने आपल्या मोहक अदा आणि घायाळ करणाऱ्या नजरेने भल्याभल्यांची दैना केली आहे. तिने अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्येसुद्धा काम केले आहे. दिपाली सय्यदचा सिनेसृष्टीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला. बंदिनी, समांतर या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत. तिच्या नृत्याचे अनेको चाहते आहेत. नुकताच तिचा आणि तिच्या मुलाचा एकत्र डान्सिंग व्हिडीओ चांगलाच वायरल होतोय. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.

या व्हिडिओमध्ये दीपाली तिच्या लेकासह रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसतेय. दीपालीच्या मुलाचे नाव अली सय्यद असून त्याला ट्रॅव्हलिंगची आवड आहे. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर त्याच्या भटकंतीचे कित्येक फोटोज तुम्हाला पाहायला मिळतील. ट्रॅव्हलिंगसोबत तो आपल्या फिटनेसला घेऊन प्रचंड डेडिकेटेड आहे. शॉर्ट फिल्ममध्ये देखील अलीने काम केले आहे. आई आणि मुलाच्या या हा डान्स व्हिडिओवर फॅन्सनी लाईक्सचा वर्षाव केलाये.. तर दीपाली ही संतूर मॉम आहे असं अनेकांनी कमेंट करत म्हटलंय.

दिपालीने जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या लोकप्रिय चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र खऱ्या अर्थाने तिची ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातूनच तिला मिळाली. दीपाली सय्यदच्या डान्सने आणि मोहक अदांनी लाखो घायाळ केले आहेत. आतापर्यंत अनेक डान्स रिआलिटी शोमध्ये दीपाली परिक्षक म्हणून सुद्धा दिसली आहे. दिपालीने करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात देखील काम केले.