Take a fresh look at your lifestyle.

दीपिकाचे प्रिया वॅरिअरला चॅलेंज; पहा ‘विंकिंग गर्ल’चा खास रिप्लाय !

टीम, हॅलो बॉलिवूड । दीपिका पदुकोण तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपट निर्मितीवेळची काही दृष्य तिने आपल्या इन्स्टा अकॉउंटला शेअर केले आहेत. तिने इंस्टाग्रामवर एक डीपीझम नावाची सिरीज सुरु केली आहे. त्या माध्यमाने तिने नुकताच आपला डोळा मारतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘छपाक’ चित्रपट जरी गंभीर असला तरी त्या सेट वर बऱ्याच गमती जमाती झाल्याचं तिच्या व्हिडीओज मधून दिसत आहे. यात दिपीकासह चित्रपट निर्माती मेघना गुलजारही आहेत. यावेळी शूटिंग संपल्यावर त्याच पेहरावात असलेल्या दीपिकाने डोळा मारून मागच्या वर्षीची ‘विंकींग सेन्सेशन’ प्रिया प्रकाश वेरिअरला चॅलेंज दिलं होतं.

प्रियाने लगेच या आव्हानिक व्हिडिओला प्रतिसाद देत, “खुद्द गॉडेस दीपिकाने विंक केलं, याहून २०१९ चा भारी शेवट काय असणार!” अशा शब्दात आपली फॅन मोमेन्ट जाहीर केली. सोबत तिने पुन्हा एकदा विंक केलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे.