Take a fresh look at your lifestyle.

दीपिका – कार्तिकच्या एअरपोर्टवरील डान्सला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल !

0

टीम, हॅलो बॉलीवूड । दीपिका पदुकोण आणि कार्तिक आर्यन यांनी काल चक्क मुंबई विमानतळावर डान्स केला. कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट येऊ घातला आहे. त्यातीलच ‘धीमे धीमे’ या गाण्यावरील एक स्टेप कार्तिकने दीपिकाला शिकविली. हा नक्कीच सर्वांसाठी एक मनोरंजक दृश्य ठरले. काही दिवसांपूर्वी दीपिकाने सोशल मीडियावरून कार्तिककडे ही अवघड डान्स स्टेप शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर कार्तिकने ‘नक्की’ असं उत्तरही दिल होत. तोच योगायोग २ दिवसांनीच जुळून आला. कार्तिक आणि दीपिकाची मुंबई विमानतळावर काळ भेट झाली, आणि चाहत्यांना पर्वणीच मिळाली.

अलिकडेच या सिनेमाचं पार्टी सॉंग ‘धीमे धीमे’ प्रदर्शित झालं. सध्या या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही काळातच धीमे धीमे गाणं इतकं ट्रेंड झालं की, अनेकांनी या गाण्यावर डान्स करत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पति पत्नी और वो’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्याच प्रमोशनचा भाग म्हणून कि काय पण कार्तिकने दीपिकाला चक्क विमानतळावर थांबवून डान्स स्टेप शिकवल्या. त्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पण त्याचसोबत त्यांच्यावर टीका व्हायलाही सुरु झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी असा डान्स करून त्यांना काय मिळालं? अशा गोष्टी तुम्ही स्वतःच्या घरी वैयक्तिक जागेत करा. पोलिसांचं कामही तुम्ही वाढवून ठेवलं आहे, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: