Take a fresh look at your lifestyle.

Uffff… ब्लॅक में ब्युटी; दीपिका पदुकोणच्या आयकॉनिक अंदाजाची चर्चा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या सौंदर्यासह अभिनयाच्या जोरावर खोलवर पाय रोवलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचा पती आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोशूट मुळे चर्चेत राहिला. या फोटोशूट मुळे विविध भागात प्रकरण चांगलेच चिघळले होते. यातच दीपिका रणवीरने कपलं शूटसुध्दा केलं. ज्यामध्ये ती दोघंही कमाल दिसत होती. यानंतर आता दीपिकाचा साधा पण स्टायलिश अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडिया Instagram वर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ एका कार्यक्रमात दीपिका एंट्री करतेवेळी तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाने अतिशय सिंपल लूक केलेला दिसतोय. ना जादा मेकअप… ना जादा हाय फाय. अतिशय सिंपल ब्लॅक डिझायनर साडीत ती दिसते आहे. ही काळ्या रंगाची साडी दीपिकाच्या गोऱ्या रंगाला आणखीच चमक देते आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा हाच अंदाज भारी चर्चेत आला आहे. एकीकडे न्यूड फोटोशूट तर कधी अतरंगी पेहराव करणारा रणवीर तर दुसरीकडे आयकॉनिक पण सिंपल राहणारी त्याची पत्नी आणि अतिशय लोकप्रिय अभिनेत्री दीपिका.

 

 

दीपिकाने परिधान केलेली साडी ही काळ्या रंगाची असून त्यावर फार वर्क केलेले नाही. ही एक सिंपल होरिझोंटल लाईन डिझाईन नेट साडी आहे. याची खासियत म्हणजे साडीवर चमकणारे स्पॉट. या साडीवर जेव्हा प्रखर लाईट पडतो तेव्हा ही साडी चमकते. दीपिकाची साडी अशीच पँपराझींच्या कॅमेरा लाइट्समुळे चमकते आहे. अस वाटतंय की दीपिकाने जणू तारे गुंडाळून घेतले आहेत. दीपिकाने एका कार्यक्रमाला हजेरी लावताना ही साडी परिधान केली आहे आणि हा व्हायरल व्हिडिओ देखील त्याचवेळेचा आहे. यावर अनेक नेटकरी आणि चाहत्यांनी विविध कमेंट्स करीत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे.